सुनील गावस्कर का म्हणाले, कोहलीचे नशीब चमकणार, २०२२ घेऊन येणार त्याच्यासाठी गुडलक?

विराट कोहलीचा फॉर्म सध्या खराब चालला आहे पण आता त्याचे नशीब बदलण्याची वेळ आली आहे, असे मत भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. सेंच्युरियनमध्ये टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्याने आशा व्यक्त केली की, 2022 कोहलीसाठी गुडलक घेऊन येईल आणि पुन्हा एकदा कोहलीची बॅट रनांचा पाऊस पडताना दिसणार. गुरुवारी सेंच्युरियन येथे भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर … Read more

विराट खोटं बोलला? कर्णधारपदाच्या वादावर चीफ सिलेक्टरने केला खुलासा, म्हणाले, विराटला..

भारताचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय माजी कर्णधार विराट कोहली हा देखील एकदिवसीय संघाचा एक भाग आहे. पत्रकार परिषदेदरम्यान चेतन शर्मा यांनी विराट … Read more

‘दबंग ४’ साठी सलमान खानने ‘या’ दिग्दर्शकाशी केली हातमिळवणी; बॉक्स ऑफिसवर होणार धमाका

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या अनेक चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अभिनेता सध्या आगामी चित्रपट ‘टायगर 3’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान खानने त्याच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, असा खुलासाही झाला आहे. याशिवाय तो लवकरच ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलमध्ये काम करणार असल्याचेही सांगितले. आता समोर आलेल्या ताज्या बातम्यांनुसार, अभिनेत्याने ‘दबंग … Read more

२०२२ मध्ये एलियन सोबत लढाई होऊन, पृथ्वी अंधारात बुडणार – टाईम ट्रॅव्हलर्सचा भयानक दावा..

आलेल्या २०२२ सालाबद्दल बाबा वेंगापासून ते नॉस्ट्राडेमस पर्यंत सर्वांनी वेगवेगळे दावे आणि भविष्यवाणी केली आहे. आता स्वतःला टाईम ट्रॅव्हलर्स म्हणवणारे लोकही यामध्ये सामील झाले आहेत. या लोकांचे टिकटॉकवर लाखो फॉलोअर्स आहेत. या टाईम ट्रॅव्हलर्सच्या मते, या नवीन वर्षात, एलियनशी युद्ध होऊ शकते आणि समुद्रात बुडलेल्या अटलांटिस या पौराणिक शहराचा शोध लागू शकतो. एका ट्रॅव्हलरने तर … Read more

मला ठग म्हणू नका, जॅकलीन आणि मी…; २०० कोटी मनी लाँड्रींग प्रकरणात सुकेशचे जॅकलीनवर गंभीर आरोप

२०० कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ठग सुकेश चंद्रशेखरच्या चौकशीदरम्यान जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आले. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या ज्या तपास यंत्रणेने जप्त केल्या आहेत. आता सुकेशच्या वकिलांना मोठा खुलासा केला आहे. आता सुकेशचे वकील अनंत मलिक यांनी एक निवेदन जारी केले आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की आरोपीला ‘फसवणूक … Read more

RRR: अजय आणि आलिया भूमिकेबद्दल राजामौलिंचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘मला प्रेक्षकांना फसवायचे नाही’

चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. राम चरण, एनटीआर ज्युनियर, आलिया भट्ट, अजय देवगण यांनी साकारलेला हा चित्रपट ७ जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मी चित्रपटातील व्यक्तिरेखेबद्दल बोललो आहे. आलिया भट्ट ‘आरआरआर’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारत आहे. त्याचवेळी अजय देवगणची व्यक्तिरेखा ताकदीचा मास्टर … Read more

‘हम साथ साथ है’ मधली चिमुरडी बनली सुपरमॉडेल; फोटो पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

असे अनेक बॉलीवूड चित्रपट आहेत ज्यात छोट्या पात्रांनी चित्रपटात जीव ओतला आहे. चित्रपट पूर्ण करण्यासोबतच या छोट्या स्टार्सनी प्रेक्षकांच्या हृदयातही आपले खास स्थान निर्माण केले आहे. वर्षांनंतरही लोक ना त्याचा चेहरा विसरले ना त्याचे पात्र, 21 वर्ष जुना चित्रपट ‘हम साथ-साथ है’ हा आजही लोकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने … Read more

शेवटच्या आठ मिनिटांत कोहलीने दक्षिण आफ्रिकेसोबत केला मोठा गेम, खेळाडू पाहतच राहिले

भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. अलीकडेच कोहलीकडून एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. त्यावरून बराच वादही झाला होता. पण बीसीसीआयकडे विराटकडून कर्णधारपद काढून घेण्याची स्वतःची अशी कारणे होती. त्याची कारणेही अशी आहेत, ज्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा होते. मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून विराट कोहली अजूनही … Read more

‘मला कसलेही कारण न देता संघातून काढून टाकले’, हरभजनचा धोनीवर खळबळजनक आरोप

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटला राम राम ठोकल्यानंतर हरभजन सिंग समोर आला असून त्याने एकामागून एक धडाकेबाज खुलासे केले आहेत. हरभजन सिंगने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केले आहेत. हरभजन सिंगच्या म्हणण्यानुसार, त्याला कोणतेही कारण न देता टीम इंडियातून वगळण्यात आले. 2011 च्या विश्वचषकानंतर हरभजन सिंगने केवळ 10 … Read more

ही महिला फक्त मोबाईल चालवते आणि कमावते बक्कळ पैसा, त्याच पैशातून करते १२ मुलांचा सांभाळ

ब्रिटनी चर्च नावाच्या ३३ वर्षीय महिलेने तिच्या कंपनीतील नोकरी सोडून घरी बसण्याचा निर्णय घेतला. १२ मुलांची आई आता फक्त तिच्या फोनवर व्हिडिओ बनवून एक मोठे कुटुंब वाढवत आहे. कारखान्याच्या कामात ती तासनतास बाहेर राहायची, पण आता ती घरी बसून व्हिडीओ बनवते आणि मिळणाऱ्या पैशातून आरामात घर चालवत आहे. १२ मुलांचे कुटुंब असण्याचा अर्थ आपल्या सर्वांना … Read more