Homeइतर२०२२ मध्ये एलियन सोबत लढाई होऊन, पृथ्वी अंधारात बुडणार - टाईम ट्रॅव्हलर्सचा...

२०२२ मध्ये एलियन सोबत लढाई होऊन, पृथ्वी अंधारात बुडणार – टाईम ट्रॅव्हलर्सचा भयानक दावा..

आलेल्या २०२२ सालाबद्दल बाबा वेंगापासून ते नॉस्ट्राडेमस पर्यंत सर्वांनी वेगवेगळे दावे आणि भविष्यवाणी केली आहे. आता स्वतःला टाईम ट्रॅव्हलर्स म्हणवणारे लोकही यामध्ये सामील झाले आहेत. या लोकांचे टिकटॉकवर लाखो फॉलोअर्स आहेत. या टाईम ट्रॅव्हलर्सच्या मते, या नवीन वर्षात, एलियनशी युद्ध होऊ शकते आणि समुद्रात बुडलेल्या अटलांटिस या पौराणिक शहराचा शोध लागू शकतो. एका ट्रॅव्हलरने तर दावा केला कि, पृथ्वी अंधारात जाईल आणि इजिप्तचे पिरॅमिड देखील हवेत उडतील.

स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणणाऱ्या @aesthetictimewarper ने म्हटले आहे कि, येत्या २ फेब्रुवारी रोजी अटलांटिक महासागरात अटलांटिस शहर शोधले जाईल. तसेच या महिन्यात एक व्यक्ती पुढे येईल आणि आपल्या मृत्यूसंदर्भात जगाला उल्लू बनवल्याचे कबूल करेल. त्याच वेळी, टिकटॉक वापरकर्ता @futuretimetraveller म्हणाला की, २०२२ पृथ्वीवर विनाशकारी घटना घडेल.

या ट्रॅव्हलरने असाही दावा केला आहे की, महाकाय एलियन पृथ्वीवर आक्रमण करतील आणि मानवतेशी लढतील. हे अक्राळविक्राळ प्राणी ७ फूट लांब आणि गडद तपकिरी रंगाचे असतील. ज्याला आपण एलियन म्हणतआहोत, ते २०२२ मध्ये पृथ्वीवर दिसतील. त्याचा अचूक दिवस २४ मे २०२२ असू शकतो. आणखी एका कथित टाइम ट्रॅव्हलर @thatonetimetraveler ने सांगितले की, एका मोठ्या ज्वालामुखीचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होईल.

अल कायदाच्या ९/११ च्या हल्ल्यापासून ते अमेरिकेतील सुनामीपर्यंत अचूक भाकीत करणारे बाबा वेंगा यांनी २०२२ मध्ये घातक विषाणू येईल असा इशारा दिला आहे. एवढेच नाही तर नवीन वर्षात एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात असेही त्यांनी म्हटले आहे. नाकतोड्यांच्या हल्ल्यामुळे भारतात उपासमार होऊ शकते. असा इशारा देखील बाबा वांगे यांनी दिला. बाबा वांगे यांना बाल्‍कन प्रदेशातील नॉस्ट्राडेमस म्हणूनही ओळखले जाते.

बाबा वेंगाचे खरे नाव व्हेंजेलिया गुश्तेरोवा असून १९९६ मध्ये त्यांचे निधन झाले. बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये झाला आणि त्यांनी दावा केला की देवाने त्यांना भविष्य पाहण्याची दुर्मिळ भेट दिली आहे. वयाच्या १२ व्या वर्षी बाबा वेंगा यांची भीषण वादळात त्यांची दृष्टी गेली. त्याने स्वतःच आपल्या मृत्यूचा अचूक अंदाज वर्तवला होता. बाबा वेंगा यांनी १९९६ मध्ये मरण पावत असताना ५०७९ सालापर्यंत भविष्यवाणी केली होती.

नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये जगभर जबरदस्त महागाई येणार आहे आणि अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य घसरणार आहे. २०२२ मध्ये सोने, चांदी, बिटकॉइन यामधील गुंतवणुकीलाच संपत्ती समजले जाईल आणि यातील गुंतवणुकीत मोठी वाढ होईल. नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार पुढीलवर्षी एक भयानक अणुस्फोट होईल आणि यामुळे पर्यावरणात मोठा बदल होईल. याचा पृथ्वीवर विपरित परिणाम होईल.
महत्वाच्या बातम्या
RRR: अजय आणि आलिया भूमिकेबद्दल राजामौलिंचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘मला प्रेक्षकांना फसवायचे नाही’
ही महिला फक्त मोबाईल चालवते आणि कमावते बक्कळ पैसा, त्याच पैशातून करते १२ मुलांचा सांभाळ  
गुगल मॅपने पोहोचवले थेट झाडाझुडपांमध्ये; नंतर सांगितले, ‘आंब्याच्या झाडावर गाडी घाला’