Homeखेळ'मला कसलेही कारण न देता संघातून काढून टाकले', हरभजनचा धोनीवर खळबळजनक आरोप

‘मला कसलेही कारण न देता संघातून काढून टाकले’, हरभजनचा धोनीवर खळबळजनक आरोप

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटला राम राम ठोकल्यानंतर हरभजन सिंग समोर आला असून त्याने एकामागून एक धडाकेबाज खुलासे केले आहेत. हरभजन सिंगने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केले आहेत.

हरभजन सिंगच्या म्हणण्यानुसार, त्याला कोणतेही कारण न देता टीम इंडियातून वगळण्यात आले. 2011 च्या विश्वचषकानंतर हरभजन सिंगने केवळ 10 वनडे आणि 10 कसोटी सामने खेळले होते. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2015 च्या विश्वचषकासाठीही हरभजन सिंगला संघात स्थान देण्यात आले नव्हते. महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) मुळे रविचंद्रन अश्विन (आर अश्विन) टीम इंडियात दाखल झाला.

रविचंद्रन अश्विनच्या आगमनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हरभजन सिंगचा पत्ता कट झाला. निवृत्तीनंतर हरभजन सिंगने आता आपला राग काढला आहे. हरभजन सिंग म्हणाला, ‘400 बळी घेणारा खेळाडू कसा बाद होऊ शकतो. ही एक रहस्यमय कथा आहे, जी अद्याप उघड झालेली नाही. मला अजूनही प्रश्न पडतो, ‘काय झालं? माझ्या संघात राहण्यात कोणाला अडचण होती?’

हरभजन सिंगने खुलासा केला की, त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) ला त्याच्या अनुपस्थितीचे कारण विचारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. हरभजन सिंग म्हणाला, ‘मी कर्णधाराला (धोनी) विचारण्याचा प्रयत्न केला, पण मला कोणतेही कारण सांगण्यात आले नाही. माझ्या लक्षात आले की कारण विचारण्यात अर्थ नाही, कारण तुम्ही विचारत राहिले आणि कोणीही उत्तर दिले नाही तर ते सोडून दिलेलेच बरे.’

हरभजन सिंगने 1998 मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर हरभजन सिंगने त्याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले. 2006 मध्ये हरभजन सिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हरभजन सिंग 2016 पासून टीम इंडियातून बाहेर होता.

बातमीवर विश्वास ठेवला तर तो कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीचा सपोर्ट स्टाफ किंवा कोच बनू शकतो. मेगा लिलावात हरभजन सिंग कोणत्याही संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. हरभजन सिंगने 16 वर्षे देशासाठी क्रिकेट खेळले आणि तो खूप यशस्वी ठरला. त्याने भारतीय संघासाठी 103 कसोटी सामने, 236 एकदिवसीय सामने आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 417 विकेट घेतल्या, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट्स आहेत. त्याचबरोबर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला. पंजाबमधून आलेल्या हरभजन सिंगने 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. हरभजन सिंगचा शेवटचा वनडे सामना 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता. 2016 मध्ये हरभजन सिंगने आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

हरभजन सिंगने टीम इंडियासाठी 103 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 417 विकेट आहेत. वनडेमध्ये त्याने 236 सामन्यात 269 विकेट घेतल्या आहेत. भज्जीने टी-20 मध्ये भारतासाठी 28 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 25 विकेट्स घेतल्या आहेत. 2016 मध्ये हरभजन सिंगने आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

आयपीएलमध्ये हरभजन सिंगच्या नावावर 163 सामन्यात 150 विकेट्स आहेत. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. 41 वर्षीय हरभजन सिंग या आयपीएल हंगामात कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता. मात्र, त्याला आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. हरभजन सिंगने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला होता.

हरभजन सिंग हा दिग्गज ऑफस्पिनर म्हणून गणला जातो. हरभजन सिंगने आपल्या गोलंदाजीने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले. 2001 मध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्ट्रिकही घेतली होती.

त्यावेळी हरभजन सिंग फक्त 21 वर्षांचा होता आणि त्या सामन्यानंतर हरभजन सिंग टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग बनला होता. लेगस्पिनर अनिल कुंबळेसोबतच्या त्याच्या जोडीने टीम इंडियाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. 2000 ते 2010 पर्यंत हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे या जोडीने भारतीय स्पिनचा भार सांभाळला.

महत्वाच्या बातम्या :-
‘बर्गर आणला नाही तर संपूर्ण घर पेटवून देईल’, भुकेल्या मुलाची धमकी ऐकून वडिल पोहोचले थेट कोर्टात
कोरोनामध्ये लग्न रद्द झाल्यास मिळणार १० लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे ही स्कीम
धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी