Homeखेळविराट खोटं बोलला? कर्णधारपदाच्या वादावर चीफ सिलेक्टरने केला खुलासा, म्हणाले, विराटला..

विराट खोटं बोलला? कर्णधारपदाच्या वादावर चीफ सिलेक्टरने केला खुलासा, म्हणाले, विराटला..

भारताचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय माजी कर्णधार विराट कोहली हा देखील एकदिवसीय संघाचा एक भाग आहे. पत्रकार परिषदेदरम्यान चेतन शर्मा यांनी विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याबाबतच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. चेतन शर्माने सांगितले की, विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याबाबत आधीच सांगितले होते आणि त्याबाबत आमच्यामध्ये बरीच चर्चा झाली होती.

आउलट कोहली म्हणाला होता की निवडकर्त्यांनी बैठकीदरम्यान त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची माहिती दिली होती, ज्याला त्याने सहमती दर्शवली होती. चेतन शर्मा म्हणाले, ‘निवड समितीकडे हा मुद्दा येताच त्यांनी कर्णधार बदलण्याबाबत चर्चा केली. मीटिंगच्या ९० मिनिटे आधी विराटला फोन केला.

ही कसोटी निवड बैठक होती आणि त्या वेळी आम्ही त्याला माहिती देऊ इच्छित नव्हतो. काही प्रश्न होते आणि आमची चांगली चर्चा झाली, त्यानंतर विराटने या निर्णयाला होकार दिला. ते म्हणाले, ‘आम्ही काय चर्चा केली ते उघड करू शकत नाही पण आमची चांगली चर्चा झाली. विराट हा भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे.

त्याने भारतासाठी खेळावे आणि धावा करत रहावे अशी आमची इच्छा आहे कारण संघात त्याचे स्थान महत्वाचे आहे. पण जेव्हा कसोटीच्या नेतृत्वाचा आणि नियोजनाचा प्रश्न येतो तेव्हा निवडकर्त्यांनी असा निर्णय घेतला की कसोटीमध्ये वेगळा आणि एकदिवसीयमध्ये वेगळा कर्णधार असावा. चेतन शर्मा म्हणाले, ‘तो आधीपासूनच एकदिवसीय टीमचा कर्णधार होता आणि तो साडेपाच वाजता मीटिंगला आला आणि आम्ही त्याला कळवले.

आम्हाला फक्त त्याच्यासोबत पुढे जायचे आहे. निवडकर्त्यांसाठी हा कठोर निर्णय आहे. असे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. जेव्हा तुम्ही प्लेइंग इलेव्हन बनवता तेव्हा असे होते. तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू असणार आहे, असेही चेतन शर्मा म्हणाले. त्यामुळे आता विराट खोटं बोलला होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या
मला ठग म्हणू नका, जॅकलीन आणि मी…; २०० कोटी मनी लाँड्रींग प्रकरणात सुकेशचे जॅकलीनवर गंभीर आरोप
ही महिला फक्त मोबाईल चालवते आणि कमावते बक्कळ पैसा, त्याच पैशातून करते १२ मुलांचा सांभाळ
VIDEO: कुंकू का लावले नाही?, बजरंग दलातील लोक ख्रिश्चन महिलांना विचारत होते जाब; महिलांनी ‘अशी’ घडवली अद्दल