Homeआंतरराष्ट्रीयही महिला फक्त मोबाईल चालवते आणि कमावते बक्कळ पैसा, त्याच पैशातून करते...

ही महिला फक्त मोबाईल चालवते आणि कमावते बक्कळ पैसा, त्याच पैशातून करते १२ मुलांचा सांभाळ

ब्रिटनी चर्च नावाच्या ३३ वर्षीय महिलेने तिच्या कंपनीतील नोकरी सोडून घरी बसण्याचा निर्णय घेतला. १२ मुलांची आई आता फक्त तिच्या फोनवर व्हिडिओ बनवून एक मोठे कुटुंब वाढवत आहे. कारखान्याच्या कामात ती तासनतास बाहेर राहायची, पण आता ती घरी बसून व्हिडीओ बनवते आणि मिळणाऱ्या पैशातून आरामात घर चालवत आहे.

१२ मुलांचे कुटुंब असण्याचा अर्थ आपल्या सर्वांना समजतो. केवळ खाण्यापिण्यावर त्यांना दरमहा हजारो रुपये खर्च करावे लागतात. यानंतर मुलांचे कपडे आणि डायपरचा खर्च वेगळा. अमेरिकन महिला ब्रिटनीला यासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही, कारण तिने आपला व्यवसाय सुरू केला आहे.

एकेकाळी कारखान्यात काम करणारी ब्रिटनीचा नवीन व्यवसाय, तिचे सोशल मीडिया करिअर आहे. घरी बसून ती तिच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित व्हिडिओ बनवते आणि टिकटॉकवर अपलोड करते आणि त्यातून खूप पैसे कमावते. ब्रिटनीचे टिकटॉकवर १.८ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि त्यापासूनच ती घरच्यांचा खर्च पूर्ण करत आहे. आम्ही असे म्हणत आहोत कारण ब्रिटनी तिला मिळालेल्या व्हूवद्वारे पैसे कमावते आणि त्यासाठी तिला कुठेही जावे लागत नाही.

वृत्तानुसार, तिच्या एका फॉलोअरने तिला तिच्या पतीच्या नोकरीबद्दल विचारले, तेव्हा अर्कान्सासमध्ये राहणाऱ्या ब्रिटनीने तिच्या २९ वर्षांच्या पतीच्या नोकरीबद्दल जास्त काही सांगितले नाही, फक्त त्याचे स्वतःचे काम असल्याचे सांगितले. ८ मुलांपर्यंत ती नोकरी करत राहिली, मात्र तीन मुलांना एकत्र जन्म दिल्यानंतर तिने नोकरी सोडली आणि तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली. त्या व्हिडिओला ५३ मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

या व्हूवच्या माध्यमातून ती क्रिएटर्स फंडातून पैसे कमवते. टिकटॉक व्यतिरिक्त इंस्टाग्रामवर ब्रिटनीचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती सांगते की, दर आठवड्याला तिला जेवणासाठी २३ हजार रुपये खर्च करावे लागतात. ती ६६ डब्बे दूध आणते आणि दर आठवड्याला ६०० डायपर लागतात.

ताज्या बातम्या