स्टाईल इज स्टाईल.. आयएम द हायकमांड .. हे प्रसिद्द डायलॉग आहेत भाजप खासदार छत्रपती उदयनराजे यांचे. उदयनराजे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. डायलॉगबाजी असो किंवा कॉलर उडवणे असो उदयनराजे यांनी केलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या फॅन्सला आवडते. उदयनराजे कधीही केव्हाही काहीही करू शकतात हे सर्वांना माहिती आहे. परंतु तुम्हाला राजेंकडे आपल्या ताफ्यांमध्ये किती आणि कोणत्या गाड्या आहेत हे माहिती आहे का ?
उदयनराजेंना बाईक रायडींग करणे अधिक पसंत असून त्यांच्याकडे अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे. आज त्यांच्या गाड्यांच्या राॅयल कलेक्शनमध्ये आणखी एका कारची भर पडली. बीएमडब्लू कंपनीची नवीनकोरी कार खरेदी केली आहे. त्याचा फोटो सोशल मिडियावर भलताच व्हायरल झाला. यावरुन त्यांची तरुणाईमध्ये किती क्रेझ आहे याची प्रचिती दिली आहे.
उदयनराजेंची तरुणाईत भलतेच ‘फेमस’ आहेत. सोशल मिडियावर तर त्यांचे लाखो फाॅलोवर असून त्यांच्या स्टाईलची अनेक जण काॅपी करतात. साताऱ्यात उदयनराजेंचे समर्थक जेव्हा नवीन गाडी विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच. अनेक वेळा स्वतः उदयनराजेंनी त्याची रायडिंग केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.
उदयनराजेंना गाड्यांचा छंद आहे. त्यांच्या ताफ्यामध्ये सध्या ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी या चार आलिशान कार आहेत. तर त्यांच्या पत्नी दमयंतीराजेंकडे पोलो ही कार आहे. त्यांच्या या राॅयल कलेक्शनमध्ये आणखी एक कार दाखल झाली आहे. बीएमडब्लू कंपनीची एक्स फाईव्ह ही नवीन कोरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये आहे.
त्यांच्या सर्व गाड्यांना 007 हा नंबर असून त्यांच्या अनेक समर्थकांच्या गाड्यांचाही हाच क्रमांक आहे. उदयनराजेंनी नवीन खरेदी केलेल्या बीएमडब्लू कारला एमएच ११ डी डी ००७ हाच नंबर घेतला आहे. आज पुण्यातून गाडी खरेदी करतानाचा त्यांचा शोरुममधील फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्याला अनेकांनी दाद दिली यावरुन समाज माध्यमांत उदयनराजेंची किती क्रेझ आहे, याचा अंदाज नक्कीच आला असेल.
राजकारणाची सुरुवात भाजपमधून करणारे उदयनराजे नेहमी चर्चेत असतात. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राजे राष्ट्रवादीत दाखल झाले आणि खासदारही झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ते पुन्हा भाजपत आले आणि राज्यसभेवर खासदार म्हणून गेले. उदयनराजेंसाठी पक्ष कधीच मॅटर करत नसल्याचे त्यांचे साताऱ्यातील अनेक समर्थक सांगतात.
ताज्या बातम्या
पेट्रोल पंपावर जाताना घ्या ‘या’ ५ गोष्टींची काळजी, कधीच होणार नाही फसवणूक
मंदिराच्या दानपेटीत कंडोम टाकायचा अन् पळून जायचा; पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर म्हणाला…
दोन मुलांचा बाप असणाऱ्या या सुपरस्टारच्या प्रेमात पडली रश्मिका? नाव वाचून हादराल
…अन् बॉयफ्रेंड अर्जून कपूरच्या नादात मलायका आपल्या मुलालाच विसरली; पहा हैराण करणारा व्हिडिओ