Homeताज्या बातम्यामंदिराच्या दानपेटीत कंडोम टाकायचा अन् पळून जायचा; पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर म्हणाला...

मंदिराच्या दानपेटीत कंडोम टाकायचा अन् पळून जायचा; पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर म्हणाला…

मंदिरांच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या एका व्यक्तीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी देवदास देसाई याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, येशूचा संदेश देण्यासाठी आपण हे करत असून त्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही.

जवळपास वर्षभरापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. देसाई मंदिराच्या आवारातून बाहेर पडायचे आणि वापरलेले कंडोम तिथे दानपेटीत टाकायचे. ‘द सन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पोलिसांनी सांगितले की, ६२ वर्षीय आरोपी देवदास देसाईने मंगळुरूच्या अनेक मंदिरांमध्ये हे कृत्य केले आहे.

तसेच बराच काळापासून त्याचा शोध सुरू होता, पण प्रत्येक वेळी तो पळून जाण्यात यशस्वी व्हायचा. गतवर्षी २७ डिसेंबर रोजी कोरजना कट्टे गावातील एका मंदिराच्या दानपेटीत वापरलेला कंडोम मिळाल्याची चर्चा होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंदिर आणि परिसरात बसवलेले कॅमेरे तपासले. अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात आरोपीचा चेहरा दिसत होता, त्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत देवदास देसाईने अशाप्रकारे अनेक मंदिरे अपवित्र केल्याचे मान्य केले. एकूण १८ मंदिरांमध्ये त्याने हे कृत्य केल्याचे आरोपीने सांगितले. मात्र, यापैकी केवळ पाच मंदिरांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.

मंगळुरूचे पोलिस आयुक्त एन शशिकुमार यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यात यशस्वी झाले. देवदास देसाई हे त्यांच्या पत्नी आणि मुलांना फार पूर्वीच सोडून गेले आहेत. ते ऑटो ड्रायव्हर म्हणून काम करायचा, पण म्हातारपणामुळे त्याने ड्रायव्हिंग सोडून प्लास्टिक गोळा करण्याचे काम करायला सुरुवात केली. आरोपीने सांगितले की, वडिलांच्या काळापासून हे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करत आहे.

आयुक्त शशीकुमार यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने सांगितले की, तो मंदिरांमध्ये वापरलेले कंडोम फेकत असे जेणेकरून त्यांची विटंबना करून तो लोकांना त्याच्या धर्माकडे वळवू शकेल. केवळ मंदिरातच नाही तर काही गुरुद्वारा आणि मशिदींमध्येही आरोपींनी हे कृत्य केले.

चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही, तो फक्त येशूचा संदेश पसरवत होता. आरोपीने असेही म्हटले की बायबलमध्ये येशूशिवाय दुसरा देव नाही असे म्हटले आहे. मी कंडोम फेकत असे कारण अपवित्र वस्तू फक्त अपवित्र ठिकाणीच टाकल्या पाहिजेत.

महत्वाच्या बातम्या-
दोन मुलांचा बाप असणाऱ्या या सुपरस्टारच्या प्रेमात पडली रश्मिका? नाव वाचून हादराल
क्राईम पेट्रोल पाहून प्रियकरासोबत मिळून पतीचा ‘असा’ केला खून, पोलिसांनी केला पर्दाफाश
आणखी एका अत्तरवाल्याच्या घरी सापडलं कोट्यावधींचं घबाड, चार तास अधिकारी मोजत होते नोटा