Homeताज्या बातम्यापेट्रोल पंपावर जाताना घ्या ‘या’ ५ गोष्टींची काळजी, कधीच होणार नाही फसवणूक

पेट्रोल पंपावर जाताना घ्या ‘या’ ५ गोष्टींची काळजी, कधीच होणार नाही फसवणूक

पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे अशा महागाईत पेट्रोल पंप अनेकदा ग्राहकांची फसवणूक होताना दिसते. त्यामुळे ग्राहकाला मोठा तोटा सहन करावा लागतो. अनेकदा लोक तक्रार करतात की कारमधील पेट्रोल लवकर संपले.

प्रत्यक्षात त्यांना माहिती नसते की, पेट्रोल पंपावरच पेट्रोल टाकणारे त्यांची फसवणूक करत आहेत. ही फसवणूक टाळता येऊ शकते. काही सोप्या टिप्स जाणून घेतल्यास तुम्ही पेट्रोल पंपावरील फसवणुकीचे बळी होण्यापासून वाचू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्या खास टिप्स.

१ अटेंडंटने इंधन भरणे सुरू करण्यापूर्वी मीटर ० वर रीसेट केल्याची खात्री करा. तुमच्या वाहनात पेट्रोल भरले जात असताना, मीटरवर लक्ष ठेवा. गाडी रिफिल करायला गेल्यावर बाहेर पडा. मीटर रीसेट केल्याचे तपासा.

२. शक्य असेल तर नेहमी नामांकित पेट्रोल पंपावरून इंधन भरावे. पेमेंट केल्यानंतर बिल जमा केल्याची खात्री करा. नेहमी क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पैसे द्या. नामांकित पेट्रोल पंपावरुन पेट्रोल भरताना फसवणूकीची शक्यता कमी असते.

३. बहुतेक लोक पेट्रोल पंपावर जाऊन १००, २०० किंवा ५०० रुपयांच्या राउंड फिगरमध्ये पेट्रोल-डिझेल भरतात. पण अनेकजण पेट्रोल पंपावर मशीन फिक्स करतात. या कारणास्तव, पेट्रोल कधीही राउंड फिगरमध्ये भरू नये. राउंड फिगरपेक्षा तुम्ही १० किंवा २० रुपये जास्त इंधन आपल्या टाकीत भरु शकतात.

४. दुचाकी किंवा कारच्या रिकाम्या टाकीत इंधन भरल्याने नुकसान होते. वाहनाची टाकी जेवढी जास्त रिकामी असेल तेवढी त्यामध्ये जास्त हवा असते. अशा परिस्थितीत पेट्रोल भरल्यानंतर हवेमुळे पेट्रोलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे टाकी नेहमी अर्धी भरलेली ठेवावी.

५. पेट्रोल पंपावरील रिफ्युलिंग पाईप खूप लांब असते. पेट्रोल ओतल्यानंतर, ऑटो कट होताच अटेंडंट नोजल काढतो. त्यामुळे पाईपमधील उर्वरित इंधन वाहनात जात नाही. ऑटो कट केल्यानंतर काही सेकंदांसाठी नोजल वाहनाच्या टाकीमध्ये राहील याची खात्री करा.

महत्वाच्या बातम्या-
मंदिराच्या दानपेटीत कंडोम टाकायचा अन् पळून जायचा; पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर म्हणाला…
दोन मुलांचा बाप असणाऱ्या या सुपरस्टारच्या प्रेमात पडली रश्मिका? नाव वाचून हादराल
आणखी एका अत्तरवाल्याच्या घरी सापडलं कोट्यावधींचं घबाड, चार तास अधिकारी मोजत होते नोटा