Homeताज्या बातम्या...अन् बॉयफ्रेंड अर्जून कपूरच्या नादात मलायका आपल्या मुलालाच विसरली; पहा हैराण करणारा...

…अन् बॉयफ्रेंड अर्जून कपूरच्या नादात मलायका आपल्या मुलालाच विसरली; पहा हैराण करणारा व्हिडिओ

प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते. ती नेहमीच हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियाचे तापमान वाढवताना दिसत असते. आता तिने २०२१ या वर्षाला खूप खास पद्धतीने निरोप देत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मलायकाने वर्षाच्या शेवटच्या दिवशी तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने २०२१ चे खास क्षण समाविष्ट केले आहेत. हे खास क्षण मलायकाने १२ महिन्यांनुसार तिचे एकूण १२ वेगवेगळे अवतार चाहत्यांना दाखवले आहेत.

या व्हिडिओमध्ये ती कधी वाळूवर चालताना दिसत आहे, तर कधी ती तिच्या बॉयफ्रेंड अर्जुनच्या मिठीत. एकंदरीत मलायका व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या स्टाइलमध्ये बोल्ड दिसत आहे. मात्र, मलायकाच्या फोटोमध्ये तिचा लाडका मुलगा अरहान कुठेच दिसत नाही. मलायकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, लोक तिच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

मलायकाच्या पोस्टची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिने जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंतच्या सुंदर आठवणींना उजाळा देत एक व्हिडिओ बनवला आहे. या रीलमध्ये एकूण १२ फोटो आहेत, ज्यामध्ये मलायका वेगवेगळ्या ड्रेसिंगमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

या रील व्हिडिओमध्ये मलायका कधी बीचवर पार्टी करताना, कधी काहीतरी खाताना तर कधी हवेत वाळू उडवताना दिसत आहे. याशिवाय एका फोटोमध्ये ती बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या मिठीत दिसत आहे. या सगळ्यामध्ये मलायकाने तो फोटो देखील समाविष्ट केला आहे ज्यामध्ये ती कोविड-१९ लस घेताना दिसत आहे, परंतु व्हिडिओमध्ये तिचा तिच्या मुलासोबतचा एकही फोटो दिसत नाही.

दरम्यान, ऑगस्टमध्ये मलायकाने इंस्‍टाग्रामवर मुलगा अरहानसोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्‍ये दोघे खिडकीजवळ उभे राहून बाहेर पाहत होते. हा फोटो शेअर करताना मलायकाने चाहत्यांना सांगितले की, अरहान त्याच्या उच्च शिक्षणासाठी मुंबईबाहेर परदेशात जात आहे. हा फोटो शेअर करून मलायका खूपच भावूक झाली. पण आता तिचा मुलगा तिच्या इयर ऑफ मेमरी २०२१ व्हिडिओमध्ये कुठेही दिसत नाही. त्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोदींनी किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले २० हजार कोटी, आले नसतील तर ‘अशी’ करा तक्रार
आणखी एका अत्तरवाल्याच्या घरी सापडलं कोट्यावधींचं घबाड, चार तास अधिकारी मोजत होते नोटा
मंदिराच्या दानपेटीत कंडोम टाकून पळून जायचा ६२ वर्षांचा व्यक्ती; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

ताज्या बातम्या