Share

राज्यात पुन्हा लॉकडाऊन ? अजित पवारांसह ‘या’ मंत्र्यांनी दिले संकेत

काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यासोबतच ओमायक्रोनचा धोकाही वाढू लागला आहे. मास्क वापरण्याची सवय लागलेली असताना देखील कोरोनाची रुग्णसंख्या वाढणे ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. यासाठी राज्य सरकारने नियमांमध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन घोषणा केली.

गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे चित्र समोर आल्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले. लोकांनी निर्बंधांचे पालन केले नाही तर लॉकडाऊन अनिवार्य असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लॉकडाऊनचे भीती सतावू लागली आहे.

काय म्हणालेत अजित पवार नेमकं
चार दिवस चाललेल्या अधिवेशनात 10 राज्यमंत्री आणि 20 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर निर्बंध वाढवावे लागतील.
मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली.
दैनंदिन रुग्णांची संख्या आणि उपाय लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.
रुग्णांची संख्या वाढत असेल तर नाइलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतील.

पुण्यापाठोपाठ मुंबईत देखील कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मंत्री अस्लम शेख म्हणाले की, मुंबईत प्रकरणे वाढत आहेत. ही संख्या वाढल्यास लॉकडाऊन करावे लागेल. महाराष्ट्रातील लोक खूप घाबरतात आणि रुग्णालयात दाखल होतात. सध्या तरी तसे नाही. मात्र, अशीच स्थिती राहिल्यास लॉकडाऊन लागू करावा लागेल, असे शेख म्हणाले.

लग्न आणि कार्यक्रमांना गर्दी होत आहे. सरकारी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन अनिवार्य आहे. जानेवारीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. लोक अजूनही नियम पाळत नाहीत, त्यामुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागणार आहे. लोकांना लॉकडाऊन परवडत नाही, त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करा असे स्पष्ट संकेत नवाब मलिक यांनी दिले.

ओमायक्रोन आणि त्यात वाढती कोरोनाची आकडेवारी यामुळे लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चानी सध्या जोर धरला आहे. परिस्थिती आटोक्यात असली तरी चिंताजनक आहे. म्हणूनच अद्याप कडक नियम लावण्यात आलेले नाहीत. मात्र सर्वच मंत्र्यांनी रुग्णसंख्या वाढली तर नियमांमध्ये बदल करण्याचे संकेत असल्याचे सांगितले आहे.

ताज्या बातम्या
पेट्रोल पंपावर जाताना घ्या ‘या’ ५ गोष्टींची काळजी, कधीच होणार नाही फसवणूक
मंदिराच्या दानपेटीत कंडोम टाकायचा अन् पळून जायचा; पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर म्हणाला…
दोन मुलांचा बाप असणाऱ्या या सुपरस्टारच्या प्रेमात पडली रश्मिका? नाव वाचून हादराल
…अन् बॉयफ्रेंड अर्जून कपूरच्या नादात मलायका आपल्या मुलालाच विसरली; पहा हैराण करणारा व्हिडिओ   

इतर

Join WhatsApp

Join Now