नुकताच रितेश देशमुख आणि जेनेलियाचा वेड चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भरगोस कमाई केली आणि प्रेक्षकांना वेड लावले. या चित्रपटातील गाणीही हिट झाली. अजय अतुलच्या आवाजाच्या जादुने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.
या चित्रपटाक दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनीही महत्वाची भूमिका साकारली आहे. रितेश देशमुखने त्यांच्यासोबत काम केल्यानंतर अनुभव शेअर केला आहे. अशोक मामांसोबत काम करता यावं असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. अनेक वर्षे वाट पाहिल्यानंतर रितेश देशमुखला ही संधी मिळाली.
रितेश देशमुखचं स्वप्न होतं की, त्याला अशोक मामांसोबत काम करायचं होतं आणि त्याचं हे स्वप्न पुर्ण झालं. रितेश देशमुखने वेड चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. तसेच त्याने या चित्रपटात मुख्य भूमिकाही साकारली आहे. दिग्दर्शन करताना रितेश देशमुखचा हा पहिलाच चित्रपट होता.
या चित्रपटात अशोक सराफ यांनी रितेश देशमुखच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. नुकतीच रितेश देशमुखची एक मुलाखत पार पडली यामध्ये त्याने अशोक मामांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. त्याचा या मुलाखतीतील एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तो बोलताना दिसत आहे की, अशोक मामांसारख्या महानायकासोबत काम करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. मी गेली अनेक वर्षे याची वाट पाहत होतो. अखेर वीस वर्षांनी मला ती संधी मिळाली. या चित्रपटात मी त्यांच्याबरोबर कामही करतोय आणि त्याचे दिग्दर्शनही करतोय यापेक्षा आनंदाची दुसरी कोणती गोष्ट असू शकत नाही.
दरम्यान, अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस काही दिवसांपुर्वी पार पडला. यानिमित्ताने रितेशने एक खास व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहीले होते की, काही लोकांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला आश्वासक वाटतं, धीर येतो. अशोक सराफ हे तसंच नाव.
अशोक मामा, तुम्ही आज पंचाहत्तरीची तरूणाई गाठली. वेड चित्रपटाच्या निमित्ताने मी दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न केला आणि पहिला प्रयत्न असूनही तुम्ही आशिर्वादासारखे माझ्या पाठिशी उभे राहिलात. तुमच्या सहभागाने आम्हाला केवळ धीर नाही आला तर चित्रपटालाच धार आली आहे. मामा तुम्हाला आरोग्य, दीर्घाआयु आणि समाधान लाभो हीच निसर्गाकडे प्रार्थना, अशी पोस्ट रितेशने केली होती.
महत्वाच्या बातम्या
‘या’ ६ मराठी चित्रपटांचे रिमेक बनवून साऊथ इंडस्ट्रीने कमावलाय बक्कळ पैसा, वाचून अवाक व्हाल
महाराष्ट्रातील ‘या’ गावात शेतजमिनीला बांधच नाहीत, तब्बल ९५ हजार एकर जमीन बिनाबांधाची
Pandharpur : विठूरायाला भाविकांनी अर्पण केले पोतंभर खोटे दागिने, पण हे दागिने आले कुठून?
आधी त्याच्यासोबत केला डान्स अन् मग स्टेजवरच केले किस; गौतमी पाटीलचा व्हिडीओ आला समोर