सध्या रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या वेड चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २० कोटींपेक्षा जास्त कमावले आहेत. या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून थिएटर मालकांनी अवतार २ चे शो थांबवले आहेत.
त्याजागी वेड चित्रपटाचे शो दाखवले जात आहे. पण दुसरीकडे वेड हा दाक्षिणात्य चित्रपट मजीली या चित्रपटाचा रिमेक असल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. एवढच काय तर रितेशनेही हे मान्य केले आहे पण तरीही या चित्रपटाला पाहण्यासाठी लोकांची तुंबड गर्दी थिएटरमध्ये होत आहे.
हा चित्रपट सैराटचा रेकॉर्ड मोडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. पण त्याआधी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मराठीतील काही रिमेक बनवून दाक्षिणात्य चित्रपटांनीही बक्कळ पैसा कमावला आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांची यादी सांगणार आहोत.
सैराट चित्रपट खुप हिट झाला. १०० कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला मराठी चित्रपट होता. या चित्रपटाचा रिमेक कन्नड भाषेत करण्यात आला होता ज्याचे नाव मनसु मलिगे असे होते. तसेच बॉलिवूडमध्येही याचा धडक नावाने रिमेक बनवण्यात आला होता.
१९८८ साली अशी ही बनवाबनवी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानेही खुप मार्केट गाजवलं आणि आजही लोक हा चित्रपट आवडीने पाहतात. १९९१ साली चित्रम भलारे विचित्रम या नावाने त्याचा तेलुगू भाषेत रिमेक करण्यात आला होता. ही गोष्ट खुप कमी लोकांना माहिती आहे.
आणखी काही चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर १९९३ साली झपाटलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानेही एक वेगळे स्थान निर्माण केले होते. या चित्रपटाचा २००१ साली ओम्मो बोंमा या नावाने तेलुगू भाषेत रिमेक करण्यात आला होता.
या चित्रपटातील बाहुलादेखील सेमच वापरला होता जो झपाटलेलामध्ये वापरण्यात आला होता. शिक्षणाच्या आईचा घो हा चित्रपटही खुप गाजला होता. त्याचा रिमेकही तेलुगूमध्ये बनवण्यात आल होता ज्याचे नाव धोनी असे होते. रवी जाधव यांनी दिग्दर्शन केलेला टाईमपास हा चित्रपटही खुप गाजला होता.
या चित्रपटाचाही रिमेक तेलुगूमध्ये करण्यात आला होता ज्याचे नावआंध्र पोरी असे होते. २०१० साली स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेचा मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा खुप हिट झाला होता. त्यातील गाणीही खुप गाजली होती. याचे अनेक रिमेक नंतर बनवण्यात आले होते. बॉलिवूडमध्ये मुंबई दिल्ली मुंबई या नावाने रिमेक काढण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
१२० महिलांवर अत्याचार करणाऱ्या ‘जलेबी बाबा’ला टीम इंडियाच्या ‘या’ बहादूर क्रिकेटपटूमुळे पकडले
IPL खेळण्याच्या तयारीत असलेल्या बुमराहला BCCI ने अचानक बोलावले टिम इंडीयात, समोर आले मोठे कारण
kolhapur : देवालाही सोडलं नाही! ज्योतिबाची ४०० एकर जमीनच विकली, कोल्हापूरच्या राजकीय नेत्यांचा निर्लज्जपणा
sanjay raut : उद्धव ठाकरे राजकारणातून संन्यास घेणार अन्…; सर्वात जवळच्या सहकाऱ्याने दिली महत्वाची माहिती