पुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, पंढरपूरचा विठूराया हा नवसाचा आहे. पुर्ण महाराष्ट्रातील भाविक या विठूरायाकडे साकडे घालतात आणि आपल्या इच्छा, आकांशा पुर्ण व्हाव्यात म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करतात. विठूराया त्यांची इच्छा पुर्णही करतो.
काही भाविक देवाला बोललेले नवस मंदिरात येऊन पुर्ण करतात. विठूराया हा सगळ्यांचा देव आहे त्यामुळे त्याला भाविक काहीना काही अर्पन करत असतात. त्यामध्ये सोन्या चांदीच्या छोट्या-मोठ्या दागिन्यांचाही समावेश असतो. लोकं हे दागिने दानपेटीत अर्पन करत असतात.
आता ज्या भाविकांना सोन्या चांदीचे दागिने अर्पन करणे परवडत नाही असे भाविक विठूरायाच्या चरणी खोटे सोन्या-चांदीचे दागिने अर्पन करतात. काही भाविकांची परिस्थिती नसते की ते सोन्या-चांदीचे दागिने विठूरायाला अर्पन करतील. असंही असू शकतं की काही भाविकांची सराफांनी फसवणूक केली असावी.
काही भाविकांना खरे दागिने म्हणून खोटे दागिने विकले गेले असावेत. काही सराफ ग्राहकांची फसवणूक करतात यात शंका नाही. तेच दागिने विठूरायाच्या चरणी लोकं अर्पन करतात. कदाचित त्यांनाही माहिती नसेल की आपण जे दागिने अर्पन करत आहोत ते खोटे आहेत. दर महिन्याला दानपेटी उघडली जाते.
त्या दानपेटीत पैशांसोबत असे दागिनेही असतात. खऱ्या दागिन्यांसोबत खोटे दागिनेही सापडतात. अशावेळी या लहान दागिन्यांची तपासणी करण्यासाठी विठ्ठल मंदिराचे सराफ असतात. ते या दागिन्यांची तपासणी करतात. जे दागिने खऱ्या सोन्या-चांदीचे आहेत ते बाजूला काढून ठेवतात आणि त्यांची नोंद करून ठेवतात. जे दागिने खोटे आहेत त्यांचीही नोंद ठेवली जाते आणि ते एका पोत्यात भरले जातात.
सध्या देवाच्या खजिन्यात खऱ्या दागिन्यांसोबत असे खोटे दागिनेही जमा झाले आहेत. असे पोतेभरून खोटे दागिने जमा झाले आहेत. भाविकांनी सोनं किंवा चांदी खरेदी करताना पावती घेतली नसल्याने त्यांची अशी फसवणूक होते. दागिने खरेदी करताना पावती घेणे गरजेचे आहे. मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी ही भावना बोलून दाखवली.
महत्वाच्या बातम्या
शाहरुखच्या पठाणला धडा शिकवण्यासाठी हिंदीत येतोय NTRचे काका बालकृष्ण यांचा ‘अखंडा’
6 महिन्यांनंतर घरी परतला फौजी पती, गर्भवती पत्नीला पाहून झाला भावूक, पहा व्हिडीओ
क्रेटाच्या किंमतीत मिळत आहेत BMW च्या लक्झरी कार; रोड टॅक्स भरण्याचेही काही झंझट नाही
मुलीच्या मृत्यूचा आईला बसला जबर धक्का, एकाच दिवसाने आईनेही सोडले प्राण; हृदय पिळवटून टाकणारी घटना…