महाराष्ट्र राज्य शेती संपन्न आहे. शेती म्हटले की भावबंदकीचे वाद जे पिढ्यांपासून चालू असता ते समोर येताच. आणि या वादांचे प्रमाण महाराष्ट्रात जास्तच आहे. त्यातही शेताच्या बांधावरून होणारे वाद जास्त असतात.कधी कधी हा वाद टोकाला जातो तर कधी गाव पंचायत मध्येच सोडवला जातो. तर कधी कधी हाच वाद टोकापर्यंत जातो.
या वादात कधी मारामारी तर कधी हाच वाद घातपात, खुण, इतवर पोहचतो. भावाभावात बांधावरुन अनेक वाद होत असता. अशा अनेक केसेसच्या नोंदी असतील. परंतू एक गाव असे आहे जिथे शेताला बांधच नाही. असे जर कोणाला सांगितले तर कदाचित विश्वास होणार नाही. परंतू महाराष्ट्रात असे एक गा व आहे जिथे शेताला बांधच नाही.
राज्यातील हे एकमेव असे गाव आहे जिथे बांधाला एक तर दगड लावले जातात नाही तर झाडे लावले जातात. सोलापुर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात आहे. शतकानुशतके मंगळवेढा येथे ही बांध न करन्याची परंपरा चालत आली आहे. याक्षेत्रात जमीन कोरडवाहू असुन शेतात विहिरी देखील नाही. संपुर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. साधारण वर्षातून एकच पीक घेतले जाते.
ज्वारी आणि बाजरी ही या भागातील प्रमुख पीके आहेत. मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मंगळवेढा सोलापूर रोडलगत असलेल्या शेतात जवळजवळ १२ किमी पर्यंत चारही बाजूंनी कुठेच बांध नाही. या शेताचे क्षेत्र थोडेफार नसून तब्बल ३८ हजार हेक्टर आहे. म्हणजेच ९५ हजार एकर आहे.
खरं तर आता प्रश्न हाच असेल की एवढी जमीन बांधाशिवाय कशी असेल. परंतु जर समजूदारपणा असेल तर सगळं काही शक्य होऊ शकते. या भागातील जमीन सुपीक असून सपाट आहे. जमिनीचा पोत न बदलण्याचे कारण म्हणजे ४० फुटापर्यंत काळी माती आढळते. पावसामुळे या जमिनीत बांध टिकत नाही. शेतकरी आपापल्या शेतीची ओळख व्हावी म्हणून एक दगड किंवा एखादे झाड लावतात.
बांधावरुन भांडण होतांना आपण सगळ्यांनीच वाचले असते किंवा ऐकलेले असते. कधी कधी या भांडणात जीवही जातो. परंतु मंगळवेढ्यात समजूदारपणे याप्रश्नांकडे बघत बांधावरून वाद होत नाहीत. अशी सविस्तर माहिती तेथील सेवानिवृत्त शिक्षक तसेच शेतकरी ग्यानीबा फुगारे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
७० हजारांची गुंतवणूक करून कमावले तब्बल १५ लाख; पठ्ठ्याने सांगीतली शेती करण्याची भन्नाट ट्रिक
खेकड्याची शेती करून पुण्यातील बाप-लेक कमवतात लाखो रुपये, तुम्हीही करू शकता प्रयोग, जाणून घ्या…
झोपून खा नायतर लोळून! फक्त शेतीचा नाद पाहिजे; पठ्या वर्षाला कमावतो तब्बल दिड कोटी नफा; जाणून घ्या कसं?