Share

मोठी बातमी! मुलासाठी राणेंनी सोडले राजकारण, म्हणाले, ‘मला आता विश्रांतीची गरज आहे’

गोवा विधानसभा निवडणुकीची चर्चा सगळीकडे होते. यामागे मुख्य कारण होते ते म्हणजे, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि त्यांचा मुलगा आरोग्यमंत्री डॉ. विश्वजीत राणे. या दोघांमध्ये थेट लढत होणार होती. आपल्या वडिलांच्या विरोधातच मुलगा लढणार होता पण आता काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह राणे यांनी अचानक राजकीय निवृत्तीची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे.

त्यांच्या या निर्णयाने काँग्रेसचा डाव फसला आहे. निवृत्तीची घोषणा करताना राणे म्हणाले की, मला आता विश्रांतीची गरज आहे आणि तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी २१ डिसेंबरला त्यांच्या मुलाच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती.

त्यांचा मुलगा म्हणजे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याविरोधात ते निवडणूक लढणार होते. काँग्रेसनेही प्रतापसिंह राणेंची उमेदवारी जाहीर करुन सगळ्यांना धक्का दिला होता. मुलाविरोधातच बापाने रणशिंग फुंकल्याने या लढतीची पुर्ण देशात चर्चा रंगली होती. पण प्रतापसिंह राणे यांनी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात सगळ्यांनाच धक्का दिला.

त्यांनी यावेळी बोलताना राजकीय निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. यामुळे काँग्रेसचा डाव फसला आहे आणि खळबळ माजली आहे. आता पोरिम मतदारसंघात काँग्रेसचा पुढील उमेदवार कोण असणार आहे याची चर्चा रंगली आहे. येणाऱ्या निवडणूकीत काँग्रेसकडे उमेदवारच उरला नाहीये अशी अवस्था झाली आहे.

ज्यांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं त्यांनीही ऐनवेळी पक्ष सोडून देण्याची घोषणा केली आहे. गेल्या निवडणूकीत काँग्रेसला ४० पैकी १७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही काँग्रेसच्या हातात काहीच आलं नव्हतं. तेव्हा भाजपनेच बाजी मारली होती. त्यानंतर भाजपने काँग्रेसचे १५ आमदार फोडले होते. आता काँग्रेसचे फक्त २ आमदार उरले आहेत.

गोव्यात निवडणूकीसाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामध्ये भाजप, तृणमुल काँग्रेस, आप या दिग्गज पक्षांचा समावेश आहे. सध्या एकमेकांच्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच चालू आहे. काँग्रेसने सत्ता सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळे डावपेच खेळण्यास सुरूवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारचं नागिकांना मोठं गिफ्ट; सिलेंडरच्या किंमतीत केली तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी कपात
त्याला पण माहिती आहे महिंद्राची कार आहे; आनंद महिंद्रांनी शेअर केला कार ओढणाऱ्या वाघाचा व्हिडिओ
जानेवारीत तब्बल १६ दिवस बँका राहणार बंद, आजच पुर्ण करून घ्या बँकेची सगळी कामं
नवीन संकल्प! २०२२ मध्ये ‘या’ सरकारी योजनांच्या आधारे करा टॅक्स सेविंग्स, चेक करा डिटेल्स

राजकारण

Join WhatsApp

Join Now