Homeताज्या बातम्यात्याला पण माहिती आहे महिंद्राची कार आहे; आनंद महिंद्रांनी शेअर केला कार...

त्याला पण माहिती आहे महिंद्राची कार आहे; आनंद महिंद्रांनी शेअर केला कार ओढणाऱ्या वाघाचा व्हिडिओ

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. तसेच ते सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे व्हिडीओ शेअर करतात, त्यामुळे ते अनेकदा चर्चेत येत असतात. आताही त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रांच्या ट्विटर हँडलवरून एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वाघ महिंद्राच्या गाडीचा मागील बंपर फाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही तर त्याने गाडी काही अंतरापर्यंत खेचली आहे.

हा व्हिडिओ शेअर करत महिंद्रांनी गंमतीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, वाघाला माहित आहे की महिंद्रा कंपनीची वाहने स्वादिष्ट आहेत. हटके व्हिडिओ असल्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओला अनेकजण प्रतिक्रियाही देत आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, उटी ते म्हैसूरच्या रस्त्यावर थेप्पाकडूजवळ हे दृश्य दिसले. व्हिडिओमध्ये वाघ जी कार खेचत आहे ती महिंद्रा झायलो आहे. म्हणून मला वाटते की त्याने ती कार खाण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच याचे मला आश्चर्य वाटले नाही. कदाचित माझ्याप्रमाणेच त्याचाही असा विश्वास असेल की महिंद्राच्या गाड्या स्वादिष्ट असतात.

हा व्हिडिओ सुमारे दीड मिनिटांचा असून, या व्हिडिओमध्ये वाघ महिंद्रा झायलोचा मागील बंपर पकडून कार त्याच्या दिशेने खेचत आहे. इतकेच नाही तर तो महिंद्रा झायलोला अनेक ठिकाणी ओरबाडण्याचा प्रयत्न करतो. गाडीत अनेक लोकही होते. जे खुप घाबरलेले दिसत आहे.

या व्हिडिओमुळे अनेकजण महिंद्रा यांच्या कारचे कौतूकही करत आहे. याला म्हणतात महिंद्रा पावर असे एकाने म्हटले आहे. तर एकाला हसू आवरत नाहीये, कारण वाघाला बघून त्या कारमधल्या लोकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. दरम्यान, कारची बॅटरी अचानक डिस्चार्ज झाल्याने ही कार बंद पडली होती. तेवढ्यात एक वाघ येतो आणि कार खेचण्याचा प्रयत्न करतो.

महत्वाच्या बातम्या-
तरुणीने तरुणाला घरी बोलावून नशेचे औषध देत केले ‘हे’ भयानक कृत्य; तरुण म्हणाला, हात जोडतो मला सोडा
सुनील गावस्कर का म्हणाले, कोहलीचे नशीब चमकणार, २०२२ घेऊन येणार त्याच्यासाठी गुडलक?
२०२२ मध्ये एलियन सोबत लढाई होऊन, पृथ्वी अंधारात बुडणार – टाईम ट्रॅव्हलर्सचा भयानक दावा..