सध्या सगळीकडे पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकांची चर्चा आहे. जिल्हा बँकेच्या क वर्ग सहकारी बँका व पतसंस्था गटात भाजपचे उमेदवार प्रदिप कंद यांचा विजय झाला आहे. त्यांच्या या विजयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव झाला आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने धमाकेदार विजय मिळवल्याने ही निवडणुक सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. कारण असे पहिल्यांदाच झाले आहे की, जिल्हा बँकेच्या कारकिर्दीत विरोधी उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला हरवले आहे. तसेच भाजपने पुणे जिल्हा बँकेत प्रवेश करून इतिहास घडवला आहे.
पुणे जिल्हा बँकेच्या १४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उरलेल्या ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष्य लागून राहिलेल्या क सहकारी बँका व पतसंस्था गटामध्ये भाजपने बाजी मारली. अवघ्या जिल्ह्याचे लक्ष्य याकडे लागून राहिले होते. या गटात ८३९ मतदारांपैकी ८०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मंगळवारी झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीला धक्काच बसला. प्रदिप कंद यांना ४०५ मते मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांना ३९१ मते मिळाली होती. प्रदिप कंद यांनी सुरेश घुले यांचा पराभव करत विजय खेचून आणला. भाजप नेते प्रदिप कंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही निवडणूक कोण जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
त्याचवेळी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुरेश घुले यांना मैदानात उतरवण्यात आले होते. प्रदिप कंद यांचे आव्हान मोडित काढण्यासाठी राष्ट्रवादीने सगळी रणनिती आखली होती पण झाले उलटेच. या लढतीची दखल स्वता अजित पवारांनी घेतली होती. त्यांनी प्रदिप कंद यांच्यावर टिकास्त्र सोडले होते.
अजित पवार म्हणाले होते की, प्रदिप कंद यांना त्यांची जागा दाखवा. पण मतदारांनी प्रदिप कंद यांनाच पाठिंबा दिला आणि सुरेश घुले यांचा पराभव झाला. महत्वाचे म्हणजे अजित पवारांच्या बारामतीतून प्रदिप कंद यांना निर्णायक ५२ मते मिळाली आहेत. अजित पवारांनाही हा मोठा धक्का समजला जात आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या सहकारातील वर्चस्वाची पाळेमुळे उघडी पडली आहेत.
महत्वाच्या बातम्या
“लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात नव्हते, माझा ओबीसींवर विश्वास नाही”
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने तोडला ‘KGF’ चा रेकॉर्ड, १३ दिवसात कमावले तब्बल एवढे कोटी
नवीन वर्षाच्या निमित्ताने ईशा गुप्ता झाली रोमॅंटिक; बॉयफ्रेंडसोबतचे लिपलॉकचे फोटो झाले व्हायरल
शौर्याची भाषा करणारे गप्प का? ५६ इंचाची छाती चायना माल निघाला का? प्रसिद्ध गायकाची मोदींवर टिका