Homeताज्या बातम्या“लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात नव्हते, माझा ओबीसींवर विश्वास नाही”

“लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात नव्हते, माझा ओबीसींवर विश्वास नाही”

ठाणेमध्ये ओबीसी एकीकरण समितीच्यावतीने सन्मान सावित्रीच्या लेकींचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाषण करताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले आहे.

मंडल आयोग आला त्यावेळी आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं. पण जेव्हा लढाईची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. तर लढायला होते ते महार आणि दलित. कारण ओबीसींना लढायचं नसतं. कारण ओबीसींवर ब्राम्हण्यवादाचा पगडा बसला आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांना माहित नाही की, चार पिढ्यांपर्यंत आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळातही येऊ दिले जात नव्हते. हे तुम्ही विसरलात. त्यामुळे ओबीसीवर माझा फारसा विश्वास नाहीये, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आता आरणक्षाच्या निमित्ताने का होईना ओबीसी पुढे येत आहे. पण नुसतं पुढे येऊन आणि घरात बसून व्हॉट्सऍप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागेल, सरकारशी दोन हात करावे लागतील. आज ओबीसी समाजाची संख्या लोकसंख्या ५० टक्के आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र आपल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही, हे लक्षात घ्यायला हवं, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

ठाण्यामध्ये आग्र्यांची संख्या ५ ते १० टक्के आहे. पण त्यांचे नगरसेवक किती आहे? असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. तसेच समाजावर भूमीपूत्राचा एक वेगळा पगडा आहे. परंतू त्यांना लढायचं नाही, जे मिळेल ते घ्यायचं, असेल हरी तर देईल खाटल्यावरी अशी वृत्ती असते, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

ओबीसी बांधवांसाठी असे मेळावे घेणे सोपे आहे. परंतू असे मेळावे घेऊन चालणार नाही. मैदानात उतरुन केंद्र सरकारला सांगावे लागेल की, आमचं आरक्षण तुम्हाला काढता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला संसदेमध्ये बिल आणावे लागेल. ५० टक्क्यांची मर्यादा उडवावी लागेल. त्याचबरोबर शोषित मागासांना न्याय द्यावा लागेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही शाहरूखच्या देशाच्या आहात, तुमच्यावर भरोसा आहे’ म्हणत परदेशी फॅनने केली महीलेला मदत
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने तोडला ‘KGF’ चा रेकॉर्ड, १३ दिवसात कमावले तब्बल एवढे कोटी
के एल राहुलच्या ‘त्या’ कृतीवर भडकले मैदानावरील पंच, मागावी लागली माफी, पहा व्हिडीओ