Homeताज्या बातम्याअल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'ने तोडला 'KGF' चा रेकॉर्ड, १३ दिवसात कमावले तब्बल एवढे...

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने तोडला ‘KGF’ चा रेकॉर्ड, १३ दिवसात कमावले तब्बल एवढे कोटी

स्टायलिश स्टार अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १७ डिसेंबर रोजी हा चित्रपट तेलुगुसह हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई करत देशभरात ५० कोटींच्यावर व्यवसाय केला. तर हिंदीत या चित्रपटाने जवळपास ३ कोटींच्यावर कमाई केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाने हिंदीतील ‘केजीएफ १’ या चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहे.

अल्लू अर्जूनची दक्षिणेसोबत हिंदीतही खूप क्रेझ आहे. त्याचे हिंदीत डब केले जाणारे चित्रपटही खूप पाहिले जातात. तर आता त्याचा चित्रपट पहिल्यांदाच हिंदीतही डब होऊन संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे हिंदी प्रेक्षकांची अल्लू अर्जूनला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा ‘पुष्पा’ चित्रपटाद्वारे पूर्ण झाली आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटातील अल्लू अर्जूनच्या अभिनयाची, त्याच्या हटके स्टाईलची प्रेक्षक कौतुक करत आहेत.

समोर येत असलेल्या बातम्यांनुसार. पुष्पा चित्रपटाने हिंदी भाषेत ‘केजीएफ १’ चे रेकॉर्ड तोडले आहे. ‘केजीएफ १’ या चित्रपटाने हिंदी भाषेत एकूण ४४.०९ कोटी रूपये कमावले होते. तर ‘पुष्पा’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर १३ व्या दिवशीच ४५.५ कोटींची कमाई केली आहे. याद्वारे पुष्पा चित्रपटाने ‘केजीएफ १’ ला मागे टाकले आहे.

हिंदीत डब झालेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये ‘बाहुबली द कनक्लूजन’ या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली होती. या चित्रपटाने हिंदी भाषेत ५१०.९९ कोटी रूपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ‘२.०’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८९.५५ कोटी रूपये कमावले होते.

प्रभासच्या ‘साहो’ या चित्रपटाने १४२.९५ कोटी रूपये कमावत या यादीत तिसरे क्रमांक मिळवले होते. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर ‘बाहुबली – द बिगनिंग’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने ११८.७ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर यश अभिनित ‘केजीएफ चॅप्टर १’ हा चित्रपट ४४.०९ कोटी रूपये कमावत पाचव्या क्रमांकावर होता. तर आता ‘पुष्पा’ चित्रपटाने ४५.५ कोटी रूपये कमावत ‘केजीएफ १’ ला मागे टाकून या यादीत पाचवा क्रमांक मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बेरोजगारी, कर्जबाजारीला कंटाळून इंजिनीअर मुलाने आईचा केला खून, नंतर स्वत:लाही संपवलं

नागपूरमधल्या दोन तरुणींनी केला साखरपूडा; जाणून घ्या कशी जुळली त्यांची रेशीम गाठ
दारूने तंगाट असलेल्या आर्यन खानने एअरपोर्टवर केली लघवी? ‘जाणून घ्या’ व्हायरल व्हिडिओतील सत्य