द कपिल शर्मा शोमध्ये अनेक कलाकार आपल्या प्रमोशनसाठी येत असतात. गुरु रंधावा आणि नोरा फतेही हे दोघेही आपल्या एका अल्बमच्या प्रमोशनसाठी आले होते. नेहमी आलेल्या महिला पाहुण्यांशी फ्लर्ट करण्याची कपिल शर्माची हौस यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर दिसून आली. त्यात नोरासारखी अभिनेत्री म्हंटल्यावर कपिल शांत बसणार नव्हताच.
होस्ट कपिल शर्माने नोराबद्दल बोलून गुरुची खिल्ली उडवली आणि म्हणाला, ‘मागील व्हिडिओमध्ये तू तिला रोबोट बनवलंस, या व्हिडिओमध्ये तू तिला मरमेड बनवलंस,’ खरं सांग, तुला तुझ्या मनात काय बनवायचं आहे? गुरु हसले आणि म्हणाले की पुढच्या वेळी तो शोमध्ये येईल तेव्हा त्याला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. या उत्तरामध्ये प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
अनेक दिवसापासून बॉलिवूडमध्ये चर्चा आहेत की नोरा आणि रंधावा हे एकमेकांच्या खूप जास्त जवळ आहेत. त्यातच कपिल शर्माने त्यांना नको ते प्रश्न विचारायला सुरुवात केली. नोरा आणि रंधावा या जोडीला सोबत पाहून प्रेक्षकांनाही चांगलीच मजा यावेळी आली. मात्र यांच्या बाबत अनेक खुलासे समोर येत असताना नोरा फॅन्स काहीसे नाराज झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
कपिल नोराची नक्कल करतो
नोराला कपिलने विचारले की गुरूच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओ ‘नच मेरी रानी’पासून तिच्या नृत्यात सुधारणा झाली आहे का? ती म्हणाला, ‘खरं तर मला वाटतं की तो माझ्यासोबत नसेल तर तो नाचत नाही.’ याच्या पुढे कपिल म्हणाला, ‘बाकीच्या म्युझिक व्हिडीओमध्ये तो फक्त एकच गोष्ट करतो असे म्हणत कपिलने नोराची नक्कल केली.
नोरा सार्वजनिकपणे KISS करते
गुरू रंधावाने येथे तक्रार केली, ‘ती मतलबी आहे असं तो म्हणाला आणि नोराने किस करून त्याला गप्प केले. कपिलने विचारले की एका मुलाला दुखावल्याबद्दल त्याने गुरूचे चुंबन घेतले होते का? नोराने उत्तर दिले हो किस केले होते. रंधावा आणि नोरा यांच्यासोबत फ्लर्ट करण्याच्या नादात कपिल शर्मा शोचे काही नियम यावेळी विसरून गेल्याचे पाहायला मिळाले.
https://www.instagram.com/p/CYHAOqGppPy/?utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=1d8a0cdf-b276-4315-aed6-1b70c3934ace
नुकतेच नोरा आणि गुरु रंधावा समुद्र किनाऱ्यावर चांगला वेळ घालवताना दिसले. यानंतर त्यांच्या नात्याची बातमी समोर आली. सोशल मीडियावर लोकांनी दोघांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता कपिल शर्मा शोमध्ये हा किसिंग प्रकार झाल्यानंतर दोघांच्यातील नाते उघड झाले आहे. नोराच्या फॅन्सला मात्र यामुळे वाईट वाटत असल्याचे सोशल मीडियावरील त्यांच्या कमेंट्स पाहून लक्षात येते.
ताज्या बातम्या
पेट्रोल पंपावर जाताना घ्या ‘या’ ५ गोष्टींची काळजी, कधीच होणार नाही फसवणूक
मंदिराच्या दानपेटीत कंडोम टाकायचा अन् पळून जायचा; पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर म्हणाला…
दोन मुलांचा बाप असणाऱ्या या सुपरस्टारच्या प्रेमात पडली रश्मिका? नाव वाचून हादराल
…अन् बॉयफ्रेंड अर्जून कपूरच्या नादात मलायका आपल्या मुलालाच विसरली; पहा हैराण करणारा व्हिडिओ