भारतीय सराफ बाजारात सध्या लग्नसराईच्या हंगामामुळे मोठी गर्दी होत असुन त्यामुळे खरेदी विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लग्न समारंभात नातेवाईक आणि मित्रमंडळींना भेटवस्तू देण्यासाठी अनेक नागरिक सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. पण आता सोनं (Gold) खरेदी करणार्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
केंद्र सरकारने हॉलमार्किंगवर एक मोठा निर्णय घेतला आहे. जो सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीदारांना शुद्धतेची हमी देतो. सरकारने म्हटले आहे की ३१ मार्च २०२३ नंतर सोन्याचे दागिने ६ अंकी कोड असलेल्या हॉलमार्किंगशिवाय कुठेही विकले जाणार नाहीत. ग्राहक हिताच्या दृष्टीने ग्राहक व्यवहार विभागाने हा निर्णय घेतला आहे.
३१ मार्च नंतर हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. १ एप्रिलपासून सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींवर ६ अंकी कोड (HUID) नसल्यास त्याची विक्री केली जाणार नाही. खेड्यातील दुकाने, शहरे आणि लहान दुकानांमध्येही गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
सोन्याच्या दागिन्यांसाठी युनिक ऑथेंटिकेशन आयडी म्हणून त्याचा विचार करा. याद्वारे सोन्याच्या शुद्धतेची हमी देण्याबरोबरच त्याची निर्मिती, विक्री आणि खरेदीची संपूर्ण नोंदही असेल. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक ऍप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.
नवीन निर्णयानंतर १ एप्रिलपासून फक्त HUID हॉलमार्क असलेले सोने आणि दागिन्यांचीच विक्री करण्याची परवानगी असेल. प्रत्यक्षात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासाठी सरकारने दीड वर्षांपूर्वीच कवायत सुरू केले होते. मात्र ते फक्त दिल्ली मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनिवार्य करण्यात आले होते. तेव्हा छोट्या शहरांमध्ये हॉलमार्किंग सेंटर नसल्याचा युक्तिवाद व्यावसायिकांनी केला.
या कारणास्तव सरकारने त्यांना काही कालावधी दिला होता. मात्र आता पुरेशा प्रमाणात गोल्ड हॉलमार्क केंद्रे तयार झाल्यानंतर ते संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आले आहे. यापूर्वी सोन्याच्या व्यापाऱ्यांनी जुन्या दागिन्यांचा साठा असल्याचा युक्तिवादही केला होता. चालू हंगाम संपल्यानंतर सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे, ही दिलासादायक बाब आहे.
महत्वाच्या बातम्या
रुग्णवाहिका बंद पडल्याने शिवसेना आमदाराचा मृत्यू; कुटुंबीयांनी केले ‘हे’ गंभीर आरोप
शिंदे गटात उडाला बंडाचा भडका! एकनाथ शिंदेंनी तडकाफडकी केली ‘या’ बड्या नेत्याची हकालपट्टी
विनोदवीर सागर कारंडेची ‘चला हवा येऊ द्या’ मधून एक्झिट; पोस्टमन काकांची जागा घेतली ‘या’ कलाकाराने