शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई (Suryakant Desai) यांचे शुक्रवारी वयाच्या ८३ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. त्यांचे निधन ठाणे(Thane)जिल्ह्यातील डोंबिवली येथे झाले. उपचारासाठी देसाई यांना एक दवाखान्यातून दुसर्या दवाखान्यात नेत असताना रुग्नवाहिका बंद पडल्यामुळे त्यांचे निधन झाले, अशी त्यांच्या नातेवाईकानी माहिती दिली आहे.
देसाई यांनी मध्य मुंबईतील परळ विधानसभा मतदारसंघातून १९९५ ची निवडणूक जिंकली. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, देसाई यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता आणि त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी त्यांना व्हेंटिलेटरसह दुसर्या रुग्णालयात हलवले जात होते, मात्र त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात सुर्यकांत देसाई यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार दरम्यान देसाई यांची ऑक्सिजन लेवल खालवली.
त्यानंतर रुग्णलयात व्हेंटिलेटरसह त्यांना दुसर्या रुग्णालयात हलविण्यात आले. सुर्यकांत देसाई यांच्या मुलाने सांगितले की, ज्या रुग्णवाहिकेतून त्यांना नेले जात होते तिचा मध्यंतरी रस्त्यावर काही बिघाड झाला.रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे कुटुंबियांनी रुग्णवाहिका ढकल्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. सारे प्रयत्न निष्फळ ठरले .
अखेर सुर्यकांत देसाई यांना रुग्णालयात दाखल केले पर्याय त्यांची ऑक्सिजन लेवल ६०पर्यंत गेली आहे. यादरम्यान डॉक्टरांनी एसीसी टेस्ट केली. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. यावेळी डॉक्टरांनी देसाई यांना मृत घोषित केले. निष्काळजीपणासाठी रुग्णालय आणि रुग्णवाहिका प्रदात्यावर कुटुंबियांकडून रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
सुर्यकांत यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्यामुळेच आपली कारकीर्द शक्य झाल्याचे सांगून त्यांनी देसाईंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ही माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली असून त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
शिंदे गटात उडाला बंडाचा भडका! एकनाथ शिंदेंनी तडकाफडकी केली ‘या’ बड्या नेत्याची हकालपट्टी
विनोदवीर सागर कारंडेची ‘चला हवा येऊ द्या’ मधून एक्झिट; पोस्टमन काकांची जागा घेतली ‘या’ कलाकाराने
गौतमी पाटीलच्या कपडे बदलतानाच्या व्हिडीओबाबत तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडेंचा मोठा खुलासा