Eknath Shinde: गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत भाजपाच्या साथीने वेगळी चुल मांडली. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले. नुकतच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्यात आला आहे. मात्र, आता शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
अकोला शिवसेना (शिंदे गट( संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, सध्या त्यांचे हे पद धोक्यात आले आहे. गोपीकिशन बाजोरिया यांची पदावरुन हकलपट्टी करण्यात आली आहे.
अकोला शिवसेना संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी आता खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गोपीकिशन बाजोरिया यांची पदावरून हकलपट्टी करण्यात आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आला आहे. भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव केला होता.
पराभव झाल्यानंतर ठाकरे गटातील त्यांच वर्चस्व कमी झाले होते. यादरम्यान, महाराष्ट्रातील मोठी उलथापालच झाली. तेव्हा बाजोरिया यांनी शिंदे गटाची वाट धरली. त्यावेळी त्यांना अकोला संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. ही तक्रार शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष आणि युवा सेनेचे जिल्हाध्यांसह अन्य पदाधिकार्यांनी दिली आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील एक पत्र पाठवलं होतं.
महत्वाच्या बातम्या
विनोदवीर सागर कारंडेची ‘चला हवा येऊ द्या’ मधून एक्झिट; पोस्टमन काकांची जागा घेतली ‘या’ कलाकाराने
गौतमी पाटीलच्या कपडे बदलतानाच्या व्हिडीओबाबत तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडेंचा मोठा खुलासा
निवडणूक आयोगावरून सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला सणसणीत चपराक; तातडीने दिले ‘हे’ आदेश