Sagar Karande: झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी लोकप्रिय मालिका म्हणेज ‘चला हवा येऊ द्या.’ या मालिकेने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावला आहे. या कार्यक्रमातील भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे या कलाकारांना तर प्रेक्षकांशी डोक्यावर घेतले आहे. पण या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक दुःख बातमी समोर आली आहे.
चला हवा येऊ द्या या मालिकेतील सागरने घराघरात ओळख निर्माण केली. पण सागरने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. सागरने कार्यक्रमाला रामराम ठोकला आहे. सागरने पोस्टमनची भुमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अरविंद जगात यांनी लिहिलेले पत्र सागर कारंडेने आपल्या भावनिक शैलीत सादर केले. त्यामुळे अनेक प्रेक्षकांचे डोळे भरून आले.
चेहर्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणण्याची कला फक्त सागरच दाखवू शकतो. झी मराठीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी आपली प्रतिक्रिया देत आहेत. मालिकेतील पोस्टमन काकांची जागा दुसर्याच कलाकारांनी घेतली आहे.
पोस्टमन काकांची जागा अभिनेत्री श्रेया बुगडे हिने घेतली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये श्रेया बुगडे एक पत्र वाचून दाखवत आहे. व्हिडिओ शेअर करत. असताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, एकदा किचनमध्ये बायकोसोबत उभं तर राहून बघा. तसेच या व्हिडिओमध्ये श्रेया खास लुकमध्ये दिसत आहे.
दरम्यान, फू बाई फू या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कारंडेने एक्झिट घेतली आहे. त्यांच्या एक्झिटनंतर झी मराठीच्या या व्हिडिओवर नेटकरी प्रश्नांची सरबत करत आहेत. एका नेटकर्याने विचारलं की, सागर कारंडेने चला हवा येऊ द्या मालिका सोडली का? तर दुसर्या एकाने लिहीले की, श्रेया तुझा आवाजात सागरसारखा गंभीरपणा नाही.
सागरने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे. स्त्री पात्र असो किंवा एखाद्या कलाकाराची मिमिक्री सागरने नेहमीच त्यांच्या अनोख्यात शैलीत भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर छाप पडली आहे. मात्र, त्याने पोस्टमन काकांची भूमिका सोडल्यामुळे प्रेक्षक त्याच्यावर नाराज झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
गौतमी पाटीलच्या कपडे बदलतानाच्या व्हिडीओबाबत तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडेंचा मोठा खुलासा
निवडणूक आयोगावरून सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला सणसणीत चपराक; तातडीने दिले ‘हे’ आदेश
हल्लेखोर संदीप देशपांडेंच्या डोक्यात स्टंप घालणार इतक्यात…; वाचा घटनास्थळी नेमकं काय घडलं..