संतापजनक! मोलकरणीला नग्न करुन गुप्तांगावर मारहाण, पाच महिने एक रुपयाही दिला नाही

महिलांवर झालेल्या अत्याचाऱ्यांच्या अनेक घटना समोर येत आहे. अनेक घटना तर खुपच धक्कादायक आहेत. अशीच एक घटना आता गुरुग्राममधून समोर आली आहे. दाम्पत्याने अल्पवयीन मुलीला मारहाण करत तिच्यावर लैेंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मनीष कौर आणि कमलजीत कौर असे या दाम्पत्याचे नाव आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केल्यानंतर त्या मुलीची सुटका करण्यात आली आहे. या दाम्पत्याने मुलीवर सलग पाच महिने अत्याचार केला होता.

या दाम्पत्याने मोलकरणीला खुप खराब वागणूक दिली होती. त्यांनी तिला काठ्या, ब्लेड आणि गरम चिमट्यांनी मारहाण केली होती. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच त्यांच्या कंपन्यांनी सुद्धा त्यांना कामावरुन काढून टाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा एका इन्शुरन्स कंपनीत कामाला होता. तर पत्नी एका पीरआर एजन्सीमध्ये कामाला होती. या दाम्पत्याच्या घरात एक अल्पवयीन मुलगी काम करत होती. पण तिला मोलकरणीसारखी नाही तर एका जनावरासारखी वागणूक त्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या कंपनीने सुद्धा त्यांना काढून टाकलं आहे.

कमलजीत कौरला काढून टाकणाऱ्या कंपनीने म्हटले की, कमलजीत कौर यांच्यावर बालशोषणाचे आरोप झालेले आहे. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. आम्ही भारतीय कायद्यांचा आदर करतो. आम्ही मानवी हक्कांच्या गैरवापराच्या विरोधात आहोत. त्यामुळे कंपीनीने त्यांना काढून टाकलं आहे. तसेच मनीषच्या कंपनीने सुद्धा त्याला काढून टाकलं आहे.

मुलगी झारखंडच्या रांचीमधली असून ती फक्त १७ वर्षांची आहे. दाम्पत्य तिला रोज मारहाण करत असे. मनीष तिला नग्न करुन तिच्या गुप्तांगावर मारहाण करत असे. तसेच तिला घरात डांबून ठेवत असे. तिला तिच्या कुटुंबासोबत सुद्धा बोलू दिलं जात नव्हतं. तिच्याकडून ५ महिने काम करुन घेतले आणि तिला एक रुपयाही दिलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-
कोश्यारींचा राजीनामा अखेर राष्ट्रपतींनी स्वीकारला, ‘ही’ व्यक्ती आहे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
न्यायमूर्ती पेट्रोल भरण्यासाठी आले अन् पंपावर सुरु होता धक्कादायक प्रकार, पेट्रोल पंपच केला सील 
..म्हणून ठाकरे अन् अजितदादांनी सांगूनही मी अर्ज मागे घेतला नाही; कलाटेंनी सांगितलं खरं कारण