पेट्रोल पंपावर फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. कधी पेट्रोलमध्ये पाणी मिसळलेले असते. तर कधी चुकीचे आकडे दाखवून पेट्रोल कमी भरले जाते. आता अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या जबरलपूरमधून समोर आली आहे. या ठिकाणी पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.
पंपावर ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या लक्षात आल्यामुळे त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. न्यायमूर्ती पेट्रोल पंपावर आले होते. त्यावेळी त्यांचीही फसवणूक झाली. हे पाहून त्यांनी तक्रार दाखल केली आणि तो पेट्रोल पंप आता सील करण्यात आला आहे.
तसेच त्या परिसरातील सर्वच पेट्रोल पंपाचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाने सुरुवात कली आहे. झाले असे की गुरुवारी न्यायमूर्ती यांची कार पेट्रोल पंपावर आली होती. त्यावेळी न्यायमूर्तींच्या चालकाने त्यांना कारची टाकी फुल करण्यास सांगितले. त्यावेळी न्यायमूर्ती गाडीतच बसलेले होते.
कारमध्ये पेट्रोल भरले तेव्हा त्यामध्ये ५७ लीटर पेट्रोल टाकल्याचे बिल त्यांना देण्यात आले. पण कारच्या टाकीची क्षमताच ५० लीटरची आहे. त्यानंतर न्यायमूर्तींनी लगेचच स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. लगचेच प्राथमिक चौकशी करुन तो पेट्रोल पंप सील करण्यात आला.
तसेच एक समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. ती समिती आता त्या पेट्रोल पंपाच्या परिसरातील पंपाचा आढावा घेणार आहे. पंप रात्री उशीरा सील करण्यात आला आहे. तसेच पेट्रोल पंप सील करण्यात आल्याची माहिती इंडियन ऑईल कोर्पोरेशनलाही देण्यात आली आहे.
न्यायमूर्तींनी ही तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य समजून एसडीएम पी के सेनगुप्ता यांनी लगेचच याची दखल घेतली. त्यानंतर या पेट्रोल पंपाची प्राथमिक चौकशी पोलिसांनी केली. त्यानंतर तो पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे. आता पोलिस त्या परिसरातील इतर पेट्रोल पंपांची तपासणी करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
कसबा चिंचवड पोटनिवडणूकीत आला मोठा ट्विस्ट! अजितदादांसोबत फडणवीसांचेही धाबे दणाणले
भारताने ऑस्ट्रेलियाचा माज मोडला! एक डाव राखून दणदणीत विजय; WTC च्या फायनलमध्ये दाखल
भारतात सापडला आतापर्यंतचा सर्वात मोठा खजिना; निघणार सोन्याचा धूर