गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. त्यांनी केंद्र सरकारला आपला राजीनामा स्वीकारावा असे म्हटले होते. आता अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.
रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच लडाखचे उपराज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत.
तसेच यासोबतच अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंग कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारल्यानंतर झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना महाराष्ट्राचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.
तसेच काही नवीन राज्यपालांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री शिव प्रताप शुक्ला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल करण्यात आले आहे. त्याचबरोबर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना बिहारचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.
आतापर्यंत आर्लेकर हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. तर बिहारचे विद्यमान राज्यपाल फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी जवळपास १३ राज्यांचे राज्यपाल बदलले असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यपाल आणि उपराज्यपालांची यादी
१. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
२. लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्कीम
३. सीपी राधाकृष्णन, राज्यपाल, झारखंड
४. शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
५. गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम
६. निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
७. विश्वभूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगड
८. अनुसुईया उईके, राज्यपाल, मणिपूर
९. एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
१०. फागु चौहान, राज्यपाल, मेघालय
११. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
१२. रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
१३. ब्रिगेडियर (निवृत्त) बी.डी. मिश्रा, लेफ्टनंट गव्हर्नर, लडाख
महत्वाच्या बातम्या-
न्यायमूर्ती पेट्रोल भरण्यासाठी आले अन् पंपावर सुरु होता धक्कादायक प्रकार, पेट्रोल पंपच केला सील
कसबा चिंचवड पोटनिवडणूकीत आला मोठा ट्विस्ट! अजितदादांसोबत फडणवीसांचेही धाबे दणाणले
..म्हणून ठाकरे अन् अजितदादांनी सांगूनही मी अर्ज मागे घेतला नाही; कलाटेंनी सांगितलं खरं कारण