शिंदे गटातील आमदारांवर विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार टीका होत असते. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदेंच्या एका आमदारावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार पैठणमध्ये होते, त्यावेळी ते बोलत होते.
पैठण तालुक्यातील सारख कारखाने, आपेगाव विकास प्रतिष्ठान, एमआयडीसी, महाविद्यालय हे सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे. भुमरेंनी पैठणला काय दिलं आहे? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. पैठणमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी असे म्हटले आहे.
पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण, दोन सहकारी साखर कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठणच आपेगाव विकास प्रतिष्ठान, एमआयडीसी महाविद्यालय हे सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे. भुमरेंनी पैठणला काय दिलं आहे? असे अजित पवारांनी म्हटले आहे.
तसेच लोकांनी विचार करायला हवा. पाच वर्षे निघून जातात. एकदा शेतकऱ्यांचा पिक उद्ध्वस्त झालं, तर तीन वर्षे शेतकरी उमजत नाही. एक आमदार चुकीचा निवडला तर पुढं तुमचं वाटोळं होतं, असे म्हणत अजित पवारांनी भुमरेंना टोला लगावला आहे.
पैठण तालुक्यात शाळा, मेडिकल कॉलेज, रुग्णालय असे काही होईल याची अपेक्षा होती. पण मंत्रिपद मिळाल्यानंतर ९ दारुची दुकाने उघडली. दुकानांसमोर गतिरोधक बसवलं. का तर ग्राहकाने तिथे थांबावं आणि दारु घेऊन जावी, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, आपण शाळेच्या मुलांची काळजी घेतो. त्यांना त्रास होऊ नये म्हणून शाळेसमोर गतिरोधक बसवतो. पण इथे तर दारुच्या दुकानांसमोरच गतिरोधक बसवले जात आहे. गतिरोधक बसवून ते स्वत:चे दुकानं चालवण्याचा प्रयत्न करत आहे. कुठे फेडाल हे पाप.
महत्वाच्या बातम्या-
संतापजनक! मोलकरणीला नग्न करुन गुप्तांगावर मारहाण, पाच महिने एक रुपयाही दिला नाही
कोश्यारींचा राजीनामा अखेर राष्ट्रपतींनी स्वीकारला, ‘ही’ व्यक्ती आहे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
पुण्याच्या पोटनिवडणूकांमध्ये झाला सर्वात मोठा उलटफेर; जाणून घ्या नेमकं काय घडलं