राज्यात सध्या कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकीची चर्चा आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसब्याची तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवडची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत उमेदवारी अर्जावरुनही मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि राहूल कलाटे यांच्यात लढत होणार आहे. तर कसब्यात भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, आणि अपक्ष आनंद दवे यांच्यात लढत होणार आहे. चिंचवडमधून कलाटेंनी आणि कसब्यातून दवेंनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न केले गेले होते.
राहूल कलाटे यांनी माघार घ्यावी यासाठी शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने खुप प्रयत्न केले होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर आता राहूल कलाटे नावाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून अजित पवार, उद्धव ठाकरे राहूल कलाटेंशी संपर्क साधत होते. पण तरीही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही.
चिंचवडच्या जनतेने मला बळ दिलंय. मी लढावं असा त्यांचा रेटा आहे. लोकांना धुडकावून मी पुढे जाऊ शकत नाही. मी पुर्ण ताकदीने चिंचवडची पोटनिवडणूक लढणार आहे, अशी प्रतिक्रिया राहूल कलाटे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मी माघार घ्यावी यासाठी खुप प्रयत्न केले. अजितदादांनी सुद्धा मी माघार घ्यावी अशी सुचना केली होती. उद्धव ठाकरेंनी सुद्धा मला फोन केला होता. शिवसेनेचे संपुर्ण प्रमुख सचिन आहिर माझ्या भेटीला आले होते. पण माझ्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची इच्छा होती की मी निवडणूक लढावी, असे कलाटे यांनी म्हटले आहे.
तसेच ज्या जनतेने लक्ष्णम भाऊ जगताप असताना मला १ लाख १२ हजार मतं दिली होती. त्या जनतेचे मला प्रश्न सोडवायचे आहे. माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि माझ्या लोकांमुळे मला ही निवडणूक लढावी लागत आहे. उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नव्हता. पण कार्यकर्त्यांचाही अनादर करणे मला शक्य नव्हते, असे राहूल कलाटे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
माणूस आहे की राक्षस! दाम्पत्याने पाच महिने केली मोलकरणीला मारहाण, नग्न करुन…
…तर तुमचा पराभव निश्चित आहे असंच समजा; वसंत मोरे शिंदे-फडणवीस सरकारवर भडकले
काश्मीरमध्ये सापडला भारतातील सर्वात मोठा खजिना, पालटणार अख्ख्या भारताचं नशीब