Share

urfi javed : आता चित्रा वाघ गप्प का? त्यांचे तर कपडे सुद्धा..; महीला भाजप नेत्यावरून ऊर्फीने पुन्हा डिवचलं

urfi javed chitra wagh

urfi javed angry on chitra wagh | बिग बॉस फेम उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ तिच्याविरोधात आक्रमक झाल्या आहे. पोलिसांनी उर्फीवर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ या करत आहे.

तसेच चित्रा वाघ या रस्त्यावर देखील उतरल्या होत्या. उर्फी जिथे दिसेल तिथे तिच्या कानशिलात लगावेल, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले होते. पण हा वाद थांबायचे नाव घेत नाहीये. चित्रा वाघ यांनी टीका केली तर उर्फी जावेदही त्यांना सडेतोड उत्तर देताना दिसून येत आहे.

आता उर्फीने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. झाले असे की तामिळनाडू राज्यातील भाजपच्या नेत्या आणि अभिनेत्री गायत्री रघूराम यांनी  भाजपला राम राम ठोकला. भाजप हा महिलांसाठी सुरक्षित पक्ष नाही, असे त्या म्हणाल्या आहे. त्यावरुन उर्फीने चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

उर्फीने या बातमीचा स्क्रीनशॉट इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात उर्फीने लिहीले की, आता चित्रा वाघ गप्प का आहेत? यांचे तर कपडे सुद्धा चांगले आहेत. तुमच्या पार्टीतील लोकांमुळे हे झाले आहे. जिथे आवाज उठवायला हवा तिथे नाही आवाज उठवणार.

उर्फीने आता पुन्हा टीका केल्यामुळे चित्रा वाघ याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये चांगलाच वाद होत असून हा वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. या वादावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती.

कोणी कोणते कपडे परीधान करायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल. पण इतरांना तो अश्लील वाटत नसेल. त्यामुळे आयोग अशा गोष्टींमध्ये वेळ घालवू शकत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
रितेश-जेनेलियाचा ‘तुझे मेरी कसम’ सिनेमा टीव्हीवर का दाखवत नाहीत; अखेर २० वर्षांनी कारण आले समोर
ritesh deshmukh : मी दिवसभरात तीन वेळा जेनेलियाला…; भर शोमध्ये रितेशने दिली कबुली
अशोक मामांसोबत काम केल्यानंतर रितेशचं ‘ते’ स्वप्न झालं पुर्ण, म्हणाला, वीस वर्षांनी मला…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now