सध्या चित्रपटगृहात वेड या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया या कपलने लोकांना वेड लावले आहे. या चित्रपटाने काही दिवसांतच २० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवला आहे. रितेश आणि जेनेलिया आता महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया तुझे मेरी कसम या चित्रपटात सर्वात आधी एकत्र आले होते. याच सेटवर त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री लोकांना खुप आवडली होती. नुकतीच तुझे मेरी कसम या चित्रपटाला २० वर्षे पुर्ण झाली आहेत.
३ जानेवारी २००३ मध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या सेटवर रितेश आणि जेनेलियामध्ये जवळीक वाढली होती. यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. त्यानंतर दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले.
रितेश आणि जेनेलियाचा पहिला चित्रपट म्हणजे तुझे मेरी कसम हा चित्रपट खुप कमी लोकांनी पाहिला आहे. गेल्या २० वर्षात हा चित्रपट कोणत्याच टेलिव्हीजन चॅनलवर दाखवण्यात आला नाही. कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण याचे नक्की कारण काय आहे हे तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल.
आम्ही तुम्हाला याचे खरे कारण सांगणार आहोत. तर तुझे मेरी कसम या चित्रपटाची निर्मिती रामोजी राव यांनी केली होती. हा चित्रपट लोकांनी पुन्हा पुन्हा चित्रपटगृहात येऊन पाहावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यामुळे झालं असं की, या चित्रपटाचे राईट्स रामोजी राव यांनी कोणालाही विकले नाहीत. त्यांनी हे राईट्स आपल्याकडेच ठेवले. टीव्हीवर तेच चित्रपट दाखवले जातात ज्यांचे राईट्स विकले गेलेले आहेत.
२००३ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे राईट्स कोणालाही विकले गेलेले नाहीत. या कारणामुळे हा चित्रपट कोठेही दाखवला जात नाही. आता तुम्हाला समजलं असेल की हा चित्रपट कोठेच पाहायला मिळत का नाही? दरम्यान, वेड चित्रपटाचे दिग्दर्शनही रितेशने केले आहे. दिग्दर्शन करताना हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे.
महत्वाच्या बातम्या
अशोक मामांसोबत काम केल्यानंतर रितेशचं ‘ते’ स्वप्न झालं पुर्ण, म्हणाला, वीस वर्षांनी मला…
IPL खेळण्याच्या तयारीत असलेल्या बुमराहला BCCI ने अचानक बोलावले टिम इंडीयात, समोर आले मोठे कारण
रितेशच्या वेड चित्रपटातून ‘या’ बालकलाकाराने लावलंय प्रेक्षकांना वेड; तिची आई सुद्धा आहे प्रसिद्ध…
riteish deshmukh : रितेश देशमुख झाला भावूक, म्हणाला, अशोक मामांसारख्या महानायकासोबत काम करणं म्हणजे..