Share

गौतमी पाटीलच्या कपडे बदलतानाच्या व्हिडीओबाबत तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडेंचा मोठा खुलासा

gautami patil

लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव महाराष्ट्रातील सार्‍यानंच्याच परिचयाच झालं आहे. आपल्या नृत्यामुळे सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध लावणी कलाकार म्हणजेच गौतमी पाटील. लहानांपासून अगदी म्हातार्‍यांना आपल्या तालावर नाचवणार्‍या गौतमीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यादरम्यान, सध्या गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गौतमी एका कार्यक्रमात चेंजिंग रुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. या घटनेनंतर राजकीय आणि कला क्षेत्रातून संतप्त व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे-करवडीकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ते पाहून मला खूप वाईट वाटत आहे. हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, रमाबाईंचा आहे, सावित्री फुले यांचा आहे. अशा महाराष्ट्रात एक स्त्रीची, महिला कलावंताची हिटाळणी का केली जाते? असा प्रश्न मंगला बनसोडे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच त्या पुढे बोलताना म्हणाले की, गौतमी एक स्त्री आणि. त्यांनतर ती कलावंत आहे. त्यामुळे असा व्हिडिओ व्हायरल करन चुकीचं आहे. गौतमीच्या हातून चुका झाल्या असतील. पण तिने त्याबद्दल माफी मागितली आहे. पण स्रीजातीची विटंबना होत असल्यामुळे खुप वाईट वाटलं आहे, असे म्हणत त्यानी तळमळ व्यक्त केली.

मी देखील एक कलावंत आहे. तसचे स्री देखील आहे. त्यामुळे माझी सर्वांना तळमळीची विनंती आहे की, तो व्हिडिओ व्हायरल करणं थांबवा. अशा पद्धतीची विटंबना पुन्हा करु नका असे आवाहन देखील मंगला बनसोडे यांनी केले आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे.

चाकणकर यांनी ट्वीट करत म्हटले की, लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.‌

महत्वाच्या बातम्य
निवडणूक आयोगावरून सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला सणसणीत चपराक; तातडीने दिले ‘हे’ आदेश
हल्लेखोर संदीप देशपांडेंच्या डोक्यात स्टंप घालणार इतक्यात…; वाचा घटनास्थळी नेमकं काय घडलं..
राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी! ‘या’ राज्यात सात आमदार निवडून आणत पटकावले विरोधी पक्षनेतेपद

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now