Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

हल्लेखोर संदीप देशपांडेंच्या डोक्यात स्टंप घालणार इतक्यात…; वाचा घटनास्थळी नेमकं काय घडलं..

Tushar Dukare by Tushar Dukare
March 3, 2023
in ताज्या बातम्या, राजकारण
0

Sandeep Deshpande Attack: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर दादरमध्ये हल्ला झाल्याचे समोर आले आहे. (मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला) त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देशपांडे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला होता. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ल्याची बातमी समजताच काही कार्यकर्ते हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

संदीप देशपांडे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी ते दादर शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत होते. दरम्यान, देशपांडे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. चार अज्ञातांनी संदीप देशपांडे यांच्यावर मागून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांच्या साथीदाराने दिली.

ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला असता त्याच्यावर चार जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे जखमी झाले. त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

संदीप देशपांडे शिवाजी पार्कमध्येच वास्तव्याला आहेत. आज सकाळी ते मॉर्निंग वॉकला पार्कात आले होते. त्यावेळी याठिकाणी दबा धरून बसलेल्या टोळक्याने स्टम्पच्या साहाय्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी संदीप देशपांडे यांच्यावर मागून हल्ला केला.

हल्लेखोर देशपांडे यांच्या डोक्यात स्टम्प घालणार होते. मात्र, संदीप देशपांडे यांनी स्टम्पचा फटका हाताने अडवला. या झटापटीत त्यांच्या पायालाही दुखापत झाली.

त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याचे मनसेच्या एका नेत्याने सांगितले. मात्र, संदीप देशपांडे थोडक्यात बचावले. यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर तोंडाला मास्क लावून आले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात हा हल्ला झाला असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे.

संदीप देशपांडे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कवर आले. दरम्यान, मॉर्निंग वॉक करत असताना अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्याचा संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाहीत.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली पडले. देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांनी देशपांडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले.

Previous Post

राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी! ‘या’ राज्यात सात आमदार निवडून आणत पटकावले विरोधी पक्षनेतेपद

Next Post

गौतमी पाटीलच्या कपडे बदलतानाच्या व्हिडीओबाबत तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडेंचा मोठा खुलासा

Next Post
gautami patil

गौतमी पाटीलच्या कपडे बदलतानाच्या व्हिडीओबाबत तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडेंचा मोठा खुलासा

ताज्या बातम्या

मोदींच्या काळात न्यायव्यवस्थेवर सरकारचा मोठा दबाव? सरन्यायाधीश चंद्रचूड स्पष्टच बोलले, म्हणाले, मला स्वतःला…

March 20, 2023

कितीही काहीही झालं तरी भारतातील ‘या’ ३ बँका कधीही बुडू शकत नाहीत? तुमचे खाते त्यात आहे की नाही?

March 20, 2023

सेक्स स्टेल्थिंग म्हणजे नेमकं काय असतं? बेडवर घाईघाईत कधीच करू नका ‘ही’ चूक

March 20, 2023
crime news

दत्तक घेणारी आई की जल्लाद? इस्त्रीने जाळले, हात तोडला, मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातले लाकूड

March 20, 2023

२० वर्षांपासून घरात बंद होते बहीण-भाऊ, जगत होते नरकासारखं जीवन; कारण जाणून बसेल धक्का

March 20, 2023

पतीने सोडले, प्रियकराने वेश्या व्यवसायात लोटले; आलिशान कारने फिरणाऱ्या अभिनेत्रीची बॉडी हातगाडीवर न्यावी लागली

March 20, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group