बॉलिवूड अभिनेता सलमान खानसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सलमानने मुंबईच्या मल्हाड येथील रहिवासी केतन कक्कर याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसच्या बाजूला असलेल्या डोंगराळ जमीनीचा केतन कक्कर हा मालिक आहे. सलमानचा आरोप आहे की, केतनने एका युट्यूब चॅनलला मुलाखत देताना त्याची बदनामी केली आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार सलमानने याचिकेत म्हटले आहे की, न्यायालयाने तात्पुरत्या आदेशाद्वारे बदनामीकारक किंवा अपमानास्पद मजकूर तसेच दुर्भावणापूर्ण किंवा निंदनीय विधाने अथवा टिप्पणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लोड/अपलोड करणे, पोस्ट करणे, री-पोस्ट करणे, ट्विट करणे, रीट्विट करणे, मुलाखत देणे, पत्रव्यवहार करणे, संवाद साधणे, प्रकाशित करणे, प्रसारित करणे आदिंपासून रोखावे.
सलमानचे म्हणणे आहे की, गुगल, युट्यूब, ट्विटर आणि फेसबुक यासारख्या सोशल मीडिया साईटवरूनही त्याच्याविरोधातील अपमानास्पद मजकूर काढून टाकण्यात यावा. यासाठी त्याने या कंपन्यांनाही पक्षकार बनवले आहे. याशिवाय केतनने मुलाखत दिलेल्या शोसंबंधित इतर दोघांचीही नावे पक्षकार म्हणून सलमानच्या याचिकेत समावेश आहेत.
सलमान खान त्याच्याबद्दल आणि त्याच्या फार्महाऊसबद्दल बदनामीकारक मजकूर पोस्ट किंवा प्रकाशित करण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी आदेशाची मागणी करत आहे. दरम्यान, शुक्रवारी सलमानच्या या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सलमान खानच्या वकिलांनी आपली बाजू मांडत केतन कक्कर यांच्याविरोधात मनाई हुकूम जारी करण्याची न्यायालयाला विनंती केली.
दुसरीकडे केतन कक्करच्या वकिलांनी यास विरोध दर्शवत म्हटले की, त्यांना या प्रकरणासंदर्भातील कागदपत्रे गुरुवारी मिळाली आहेत. आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती मिळवण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे केतन कक्करला याबाबत उत्तर देण्यासाठी थोडा वेळ देण्यात यावा.
दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर केतक कक्करला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे. तर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारीला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
अभिनेते किरण मानेंनी घेतली थेट शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
टिकटॉक स्टार सुरज चव्हाणची ‘सैराट’ भरारी; मराठी चित्रपटात हिरो म्हणून झळकणार
सारेगमप लिटिल चॅम्पमधील ‘हा’ गायक लवकरच आपल्या प्रेयसीसोबत करणार लग्न






