Homeइतरअभिनेते किरण मानेंनी घेतली थेट शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

अभिनेते किरण मानेंनी घेतली थेट शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास पाटील ही भूमिका अभिनेते किरण माने यांनी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवली. मात्र आता किरण माने यांनी या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप अभिनेता किरण माने यांनी केला आहे. राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला मालिकेतून काढून टाकल्याचं माने यांचं म्हणणं आहे.

याच पार्श्वभूमीवर किरण माने यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली यावेळी किरण यांना अचानक मालिकेतून काढून टाकल्या बाबत चर्चा झाली. विशिष्ट पक्षाविरोधात लिहिल्यामुळे काढून टाकल्याचा किरण माने यांचा आरोप आहे. सुमारे दीड तास शरद पवार आणि किरण माने यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

या भेटी नंतर माध्यमांशी बोलताना किरण माने म्हणाले, ‘माझी बाजू मी शरद पवार यांच्या समोर मांडली आहे. माझ्यावर जो अन्याय झाला आहे याबाबत शरद पवार यांच्याशी बोलायला हवं असं मला वाटलं म्हणून मी आज येऊन भेट घेतली कारण माझ्यावर ज्याप्रकारे अन्याय झाला आहे तो सांस्कृतिक दहशतवादाचं उदाहरण आहे.’ असे ते म्हणाले.

“एक अभिनेता जो मनापासून काम करतो, काही त्रास न देता काम करतो, त्याला अचानक काढणं..कारणसुद्धा दिलं नाही, त्याची बाजू मांडू न देता काढणं हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. जर याविरोधात आवाज उठवायचा तर तो कोणाकडे? तर आपल्याकडे एक आणि एकच नेता आहे जो खूप संवेदनशील आहे, विचारी, विवेकी आहे आणि सांस्कृतिक क्षेत्राची माहिती असलेला आहे, तो म्हणजे शरद पवार,’ असे किरण माने म्हणाले.

दरम्यान, किरण मानेंनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गुरुवारी माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. याचबरोबर आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत. मानेंनी एका दैनिकाशी बोलताना, “होय, मला मालिकेतून काढून टाकले आहे. मला तासाभरापूर्वीच चॅनेलने ही माहिती दिली,” असे म्हणत मानेंनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला.

महत्त्वाच्या बातम्या –
टिकटॉक स्टार सुरज चव्हाणची ‘सैराट’ भरारी; मराठी चित्रपटात हिरो म्हणून झळकणार
सारेगमप लिटिल चॅम्पमधील ‘हा’ गायक लवकरच आपल्या प्रेयसीसोबत करणार लग्न
Share Market मध्ये तेजी असताना शेअर्सची खरेदी करावी की विक्री? गुंतवणूकदार हावर्ड मार्क्स म्हणतात..
पॉलिहाऊस शेतीतून बंपर कमाई! वाचा ३० लाखांचा फायदा मिळवणाऱ्या युवा शेतकऱ्याची गोष्ट