Homeबाॅलीवुडसारेगमप लिटिल चॅम्पमधील 'हा' गायक लवकरच आपल्या प्रेयसीसोबत करणार लग्न

सारेगमप लिटिल चॅम्पमधील ‘हा’ गायक लवकरच आपल्या प्रेयसीसोबत करणार लग्न

छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायक रोहित राऊत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मागील अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. पण रोहितने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तर आता स्वतः रोहितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लवकरच तो त्याची गर्लफ्रेंड जुईली जोगळेकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती दिली आहे.

रोहित राऊतने मकर संक्रांतीच्या दिवशी त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत लवकरच विवाहबंधनात अडकत असल्याची माहिती दिली आहे. इन्स्टाग्राम हँडलवर त्याने ही पोस्ट शेअर करत #10daystogo आणि #rohilee हे हॅशटॅग वापरले आहेत. त्यानंतर आज रोहितने जुईलीसोबतचा आणखी एक फोटो शेअर करत लिहिले की, तुला नेहमी हसवत ठेवणार. यासोबत त्याने #9days to go असा हॅशटॅग वापरला आहे.

रोहितसोबत जुईलीनेही तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. यावरून रोहित आणि जुईलीच्या या पोस्टवरून लक्षात येत आहे की, त्यांच्या लग्नाला आता केवळ ९ दिवस शिल्लक राहिले आहेत. आणि ते दोघे २३ जानेवारीला लग्नबंधनात अडकू शकतात.

रोहित आणि जुईलीच्या या पोस्टनंतर चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. नुकताच रोहित आणि जुईली यांचा केळवणचा कार्यक्रमही पार पडला. याचे काही फोटो रोहितचा मित्र आणि इंडियन आयडल फेम गायक नचिकेत लेले याने त्याच्या इन्स्टा स्टोरीला शेअर केले होते.

रोहित राऊतने प्लेबॅक सिंगरच्या रूपात ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’, ‘वन वे तिकिट’, ‘अवताराची गोष्ट’, ‘वजनदार’ अशा अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. मराठीसोबत हिंदीतही त्याने आपल्या गायनाचे कौशल्य दाखवले आहे. हिंदीतील प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडलमध्ये २०१९ साली झळकला होता.

दुसरीकडे रोहितची होणारी बायको जुईलीसुद्धा गायिका आहे. ती मुळची पुण्याची आहे. जुईलीने ‘सारेगमप सुर नव्या युगाचा’ या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोची ती विजेतासुद्धा बनली. या शोमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही जुईली नेहमीच सक्रिय असते. तसेच तिचं युट्यूब चॅनलदेखील आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

‘बिग बॉस मराठी’चा विजेता विशाल निकमची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला, कृपया माझे नाव..
विराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा; सोशल मिडीयावर भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला…

पारंपारिक कोळीगीतांचा बादशाह हरपला, लोकशाहीर काशीराम चिंचय यांचे दु:खद निधन