HomeUncategorizedटिकटॉक स्टार सुरज चव्हाणची ‘सैराट’ भरारी; मराठी चित्रपटात हिरो म्हणून झळकणार

टिकटॉक स्टार सुरज चव्हाणची ‘सैराट’ भरारी; मराठी चित्रपटात हिरो म्हणून झळकणार

मुंबई : आगामी “का रं देवा” चित्रपटातून प्रेक्षकांच्या या चित्रपटाच्या माध्यमातून टिकटॉक स्टार सूरज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाखो लोकांशी आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि आपल्या हटके डायलॉगने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळालेला सूरज लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

सह्याद्री फिल्म प्रोडक्शनच्या प्रशांत शिंगटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री मोनालिसा बागल देखील झळकणार आहे. सूरज हा मूळचा बारामती तालुक्‍यातील मोडवे गावचा रहिवासी आहे.

आई-वडिलांचे छत्र हरपलेला सुरज अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. बोबडे बोलणे हे त्याचे शारीरिक व्यंग आहे. मात्र त्याचे व्यंगच त्याची ओळख बनली आहे. या चित्रपटाचे निर्माते प्रशांत शिंगटे यांची भेटही सुरज सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली आणि त्यांनी सुरजला आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.

टिकटॉकने मला रातोरात मोठे केलं आणि मी जगभरात पोहचलो. प्रशांत शिंगटेजी मला भेटायला घरी आले आणि मला त्यांनी सिनेमाची ऑफर दिली तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला, असे सुरजने सांगितले. तसेच माझ्या शैलीला साजेशी अशी कॉलेजमधल्या मुलाची भूमिका मी साकारली असून प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे, अशी प्रतिक्रिया सुरजने दिली आहे.

दरम्यान, एक आदर्शमय प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं असून, पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या ११ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Share Market मध्ये तेजी असताना शेअर्सची खरेदी करावी की विक्री? गुंतवणूकदार हावर्ड मार्क्स म्हणतात..
‘बिग बॉस मराठी’चा विजेता विशाल निकमची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला, कृपया माझे नाव..
पारंपारिक कोळीगीतांचा बादशाह हरपला, लोकशाहीर काशीराम चिंचय यांचे दु:खद निधन
जेव्हा लता मंगेशकर यांना जीवे मारण्याचा झाला होता प्रयत्न, असा वाचला होता त्यांचा जीव