Share

मोठी बातमी! पंकजा मुंडेंसाठी खुर्ची सोडू; पवारांची जाहीर आॅफर

पंकजा मुंडे यांनी विचार केला तर त्यांच्यासाठी खुर्ची सोडू अशी जाहीर ऑफर आमदार रोहित पवार यांनी पंकजा मुंडे यांना दिली आहे. एका मराठी चॅनलच्या व्यासपीठावर दोघेही एकत्र आले होते. त्यावेळी हा किस्सा घडला. खरं पवार आणि मुंडे घराण्याचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. या दोन्हीही घराण्यातील नव्या पिढीने नवी सुरुवात केल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

एका मराठी चॅनेलवरील कार्यक्रमामध्ये आमदार रोहित पवार, आमदार प्रणिती शिंदे आणि पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम अगदी साधा आणि सोपा होता. कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तीला काहीना काही टास्क दिला जात होता. तसेच यावेळी मान्यवरांनामध्ये काही खेळाची स्पर्धा देखील पार पडली. याच दरम्यान रोहित पवार यांनी थेट पंकजा मुंडेंना ऑफर दिल्याचे पाहायला मिळाले.

तर झालं असं कार्यक्रमात काही खेळ या तिन्ही नेत्यांमध्ये खेळण्यात आले. यातील संगीत खुर्ची या खेळा दरम्यान दोन खुर्ची आणि तीन नेते असल्याने निवेदक असलेल्या संकर्षण कऱ्हाडे यांनी रोहित पवार आणि प्रणिती शिंदे यांना पंकजा मुंडेंना मदत करणार का? असा सवाल विचारला. त्यानंतर आलेल्या उत्तराने मात्र सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंकजा मुंडेंना मदत करणार का ? असं विचारल्यावर रोहित पवार म्हणाले, “आम्ही सहकार्य करु, पण पंकजा ताईंनी त्या पद्धतीने विचार केला तर आम्ही त्यांच्यासाठी खुर्ची सोडू”. रोहित पवारांच्या या उत्तरावर पंकजा मुंडे काही बोलणार तोच प्रणिती शिंदे म्हणाल्या, “हे असं आधी सांगायचं नसत कारण हे आमचं देखील आधीच ठरलं आहे. ” असं म्हणून एकच खळबळ उडवून दिली.

त्यावर रोहित पवार पुन्हा म्हणाले,”तुम्ही आम्हाला सोडून कसं ठरवले असा सवाल केला. ” तिन्हीही तरुण नेत्यांनी खेळ खेळता खेळात राजकारणाशी संगत केलेल्या शाब्दिक फटकेबाजीने कार्यक्रमात चांगलाच धुराळा उडाल्याचे पाहायला मिळाले. प्रेक्षकांनीही या तिघांच्या खेळाला भरभरून प्रतिसाद दिल्याचे यावेळी दिसून आले.

खेळाखेळामध्ये रोहित पवार यांनी पंकजा मुंडेंना राजकारणात आपल्या सोबत येण्याची ऑफर दिली. तर प्रणिती शिंदे यांनी त्या आपल्यासोबत येणार असल्याचे सांगितले. राजकीय शाब्दिक टोलेबाजीनी मात्र अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरु झाला आणि संगीत खुर्चीची रंगात आणखी वाढत गेली.

पुढे पुन्हा पंकजा मुंडे आणि प्रणिती शिंदे या दोघींमध्ये खुर्चीचा खेळ रंगला. यात प्रणिती शिंदे जिंकल्या. त्यावर प्रणिती शिंदे यांनी पंकजा मुंडेंसमोर खुर्ची शेअर करण्याची ऑफर ठेवली. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला. पुढे युतीच्या चर्चेवेळी प्रणिती शिंदे यांनी मैत्रीण म्हणून प्रणिती आणि पंकजा यांची युती व्हायला काहीच हरकत नसल्याचे म्हटले. त्यावर पुन्हा हशा पिकला.

ताज्या बातम्या
राज्य सरकारची पोलीस प्रशासनाला ‘ती’ सूचना अन् एसटी कर्मचाऱ्यांना सोडावे लागले आझाद मैदान; वाचा काय घडलं?
जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण आले समोर; वाचून बसेल धक्का
ATM मधून पैसे काढणे होणार महाग, जाणून घ्या एका ट्रान्सेक्शनसाठी किती लागणार पैसे?
मोठी बातमी! कोरोनाने ‘या’ राज्यात केला कहर; शाळा-कॉलेज बंद, मास्क न लावणाऱ्याला ५०० रुपये दंड

राजकारण

Join WhatsApp

Join Now