Homeताज्या बातम्याATM मधून पैसे काढणे होणार महाग, जाणून घ्या एका ट्रान्सेक्शनसाठी किती लागणार...

ATM मधून पैसे काढणे होणार महाग, जाणून घ्या एका ट्रान्सेक्शनसाठी किती लागणार पैसे?

नवीन वर्ष आता नुकतेच सुरु झाले असून या नवीन वर्षात म्हणजेच जानेवारीपासून देशभरातल्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला बँकेशी संबंधित काही मोठ्या बदलांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

हे बदल १ जानेवारीपासून लागू झालेले आहे. यामध्ये बँकेकडून पैसे काढणे, डेबिट आणि क्रेडिट कार्डे जमा करणे यासंबंधीच्या नियमांचा समावेश आहे. तुमच्या खिशातून तुम्हाला किती अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने आपल्या ग्राहकांसाठी नियम बदलले आहेत. मर्यादा संपल्यानंतर बँक आता १ जानेवारीपासून रोख रक्कम काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी खातेदारांकडून शुल्क आकारेल. हा नवा नियम १ जानेवारीपासून लागू झाला आहे.

त्यामुळे आता १० हजार रुपये काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी ग्राहकांना शुल्क भरावे लागणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या मते, बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला चार वेळा पैसे काढता येतात. मात्र आता यापुढे प्रत्येक व्यवहारावर तुम्हाला किमान २५ रुपये द्यावे लागतील.

डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी १ जानेवारीपासून काही नियमांमध्ये बदल झाला आहेत. वापरकर्त्यांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक १ जानेवारी २०२२ पासून नवीन नियम लागू करणार आहे. RBI ने निर्णय घेतला आहे की सर्व ऑनलाइन पेमेंट सुरक्षित ठेवण्यासाठी, सर्व वेबसाइट्स आणि पेमेंट गेटवेने वापरकर्त्यांचा संग्रहित डेटा काढून टाकला पाहिजे आणि व्यवहार करण्यासाठी एनक्रिप्टेड टोकन्स वापरले पाहिजे.

नवीन वर्षात एटीएममधून पैसे काढणेही महाग झाले आहे. आरबीआयने एटीएमबाबतही नवे नियम केले आहेत. याअंतर्गत ग्राहकांना आता एका मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजेच १ जानेवारीपासून देशातील सर्व बँका त्यांच्या एटीएम शुल्कात ५% वाढ करणार आहेत. त्यामुळे आता एटीएम मर्यादेपपेक्षा जास्त पैसे काढल्यास तुम्हाला २१ रुपये शुल्क भरावे लागेल. याशिवाय ग्राहकांना स्वतंत्रपणे जीएसटी भरावा लागेल.

महत्वाच्या बातम्या-
ऑनलाईन शिक्षणाचे समोर आले गंभीर परीणाम, मराठी आणि गणित विषयात विद्यार्थ्यांची झाली ‘अशी’ अवस्था
“१२ कोटींची मर्सिडीज बेन्झ घेणाऱ्या पंतप्रधानांनी आतातरी स्वत:ला फकीर म्हणून घेऊ नये”
१ महिन्याआधीच लग्न झालेल्या तरुणीने चेंगराचेंगरीत गमावला पती; ढसाढसा रडत म्हणाली, माझी काय चुक होती?