Homeताज्या बातम्यामोठी बातमी! कोरोनाने ‘या’ राज्यात केला कहर; शाळा-कॉलेज बंद, मास्क न लावणाऱ्याला...

मोठी बातमी! कोरोनाने ‘या’ राज्यात केला कहर; शाळा-कॉलेज बंद, मास्क न लावणाऱ्याला ५०० रुपये दंड

हरियाणा सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुग्राम, फरिदाबाद, अंबाला, पंचकुला आणि सोनीपतमधील सिनेमा हॉल, थिएटर, शाळा, महाविद्यालये, जिम इत्यादी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आता राज्यातील कार्यालयेही ५० टक्के उपस्थितीने काम करणार आहे. हरियाणातील हे लॉकडाऊन १२ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आले आहे.

सध्या हरियाणातील गुरुग्राम, फरिदाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत, याशिवाय बाजारपेठाही सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. बार आणि रेस्टॉरंट्समध्ये केवळ ५० टक्के लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.

नवीन नियमांनुसार, स्विमिंगपूल आता फक्त अशा लोकांसाठी उघडले जातील ज्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. तसेच एखादा खेळाडू असेल त्याला स्विमिंगपूलमध्ये पोहता येणार आहे. सर्वसामान्यांसाठी स्विमिंगपूल बंद होणार आहे. याशिवाय एंटरटेनमेंट पार्कमध्येही लोकांना प्रवेश मिळणार नाही.

हरियाणामध्ये आता लसीकरणाबाबत सक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजी मंडई ते बसस्थानक-रेल्वे स्थानकापर्यंत फक्त अशा लोकांनाच प्रवेश मिळेल ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील. ज्या लोकांना लस मिळाली आहे त्यांनाच ऑटोमध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल.

अंत्यसंस्कार आणि विवाह समारंभात अनुक्रमे ५० आणि १०० पेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकत नाहीत, तसेच उपस्थितांना कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहे. राज्यात ‘नो मास्क नो सर्व्हिस’चे काटेकोर पालन केले जाईल. कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना आणि मास्क न घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे या गोष्टींसाठी ५०० रुपये दंड आणि संस्थेने या नियमांचे उल्लंघन केल्यास ५००० रुपये दंड आकारला जाणार आहे.

तसेच हरियाणात कडक निर्बंध लावलेले असताना आता राजधानी दिल्लीतही परिस्थिती कठिण होत आहे. दिल्लीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत दिल्लीत कोरोनाचे २७१६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर संसर्गाचे प्रमाणही ३.६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

महत्वाच्या बातम्या-
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राजेश टोपेंनी दिली दिलासादायक बातमी; म्हणाले…
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यात ८० लाख रुग्ण, ८० हजार मृत्यु?; आरोग्य सचिवांच्या पत्राने उडाली खळबळ
“१२ कोटींची मर्सिडीज बेन्झ घेणाऱ्या पंतप्रधानांनी आतातरी स्वत:ला फकीर म्हणून घेऊ नये”