Share

पंजाबात पंतप्रधानांचा रस्ता अडवनारे आंदोलक भाजपचेच? ‘तो’ व्हिडीओ समोर आल्याने उडाली खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी फिरोजपूरमधील एका सभेला पंतप्रधान संबोधित करणार होते. पण आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने पंतप्रधानांना त्यांचा कार्यक्रम रद्द करून पुन्हा दिल्लीला परतावे लागले. या कार्यक्रमाला जाताना पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. या घटनेवरून देशात एकच खळबळ उडाली.

या प्रकारावरून भाजपने पंजाबमधील काँग्रेस सरकारवर हल्ला चढवला. पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती, असे स्पष्टीकरण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यावरून भाजप आणि काँग्रेस मध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनी या प्रकरणात खोचक ट्विट करत भाजपाला टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्याचा आंदोलक रास्ता अडवत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत “आंदोलकांनी भाजपचा झेंडा का घेतला आहे, नक्की ते कोण आहेत?” असा प्रश्न नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

https://twitter.com/nawabmalikncp/status/1478747263375601668?s=20

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. “पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी ही एसपीजी, आयबी आणि राज्य सरकारची पोलीस यंत्रणा यांची असते. या प्रकरणात केंद्रीय यंत्रणेची चूक झाली की राज्य सरकारच्या यंत्रणेची चूक झाली हे पाहणे गरजेचे आहे”, असे नवाब मलिक म्हणाले .

” या प्रकरणावरून सध्या राजकारण सुरु झालं आहे. भाजप आणि काँग्रेस हे पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या प्रकरणात दोषी नक्की कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे.” असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मालिक यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. नवाब मलिक यांनी या प्रकरणात केंद्र सरकारच्या यंत्रणांची चौकशी करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात पंजाबच्या सरकारला पूर्णपणे दोषी न धरता याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
ओमिक्रोनचा गेम ओव्हर? भारतात तयार झालेल्या ‘या’ औषधाने ओमिक्रोनावर करता येईल मात
कुणाला कामराने दिला मोदींना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला; काय आहे नेमके प्रकरण…
भारीच! आता ६ हजारांपेक्षा कमी रुपयांत घ्या ‘या’ तगड्या ब्रँडचे स्मार्टफोन; जाणून घ्या त्यांचे फिचर्स

राजकारण

Join WhatsApp

Join Now