Homeआरोग्यओमिक्रोनचा गेम ओव्हर? भारतात तयार झालेल्या ‘या' औषधाने ओमिक्रोनावर करता येईल मात

ओमिक्रोनचा गेम ओव्हर? भारतात तयार झालेल्या ‘या’ औषधाने ओमिक्रोनावर करता येईल मात

जगभरातील सर्व देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. भारतात देखील ओमिक्रोन या नव्या कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. लवकरच भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. ओमिक्रोन बाधित रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसत नसली तरी रुग्णसंख्येचा उद्रेक पाहता येत्या काही दिवसांत भीषण स्थिती निर्माण होईल, असे तत्ज्ञांनी सांगितले आहे.

जगभरातील वैज्ञानिक ओमिक्रोन प्रभावी औषध शोधण्यासाठी धडपडत असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. ओमिक्रॉन या नव्या कोरोना व्हेरिएंटवर लगेच मात करता येईल, असे औषध तत्ज्ञांनी शोधून काढले आहे. वैज्ञानिकांनी खूप संशोधन करून हे नवीन औषध शोधून काढले आहे.

दक्षिण आफ्रिका या देशामध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये ओमिक्रोन या नव्या कोरोना व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला होता. आतापर्यंत जगभरातील ९० पेक्षा जास्त देशांमध्ये ओमिक्रोनचा शिरकाव झाला आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला रोखण्याचे मोठे आव्हान जगातील सर्व देशांपुढे उभे ठाकले आहे. या नव्या औषधामुळे रुग्णाची संख्या कमी होणार आहे.

अमेरिकेतील फायझर कंपनीने पॅक्सलोविड या कोविडवरील औषधाची निर्मिती केली आहे. या औषधाबाबत डॉक्टर आशावादी आहेत. ओमिक्रोनवर हे औषध गुणकारी ठरेल, असे वैद्यकीय तत्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने पॅक्सलोविड याला मान्यता दिली आहे. विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व १२ वर्षांवरील मुलांना आपत्कालीन स्थितीत या औषधाचा वापर करता येणार आहे.

ओमिक्रोनमुळे पॅक्सलोविड या औषधाचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे, असे फायझर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सध्या एक कोटी रुग्णांची व्यवस्था होईल, इतका औषधांचा साठा फायझर कंपनीकडून अमेरिकेच्या सरकारला पुरवला जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेसह इतर देशांना देखील पॅक्सलोविड या कोविडवरील औषधाची गरज भासणार आहे. त्यामुळे फायझर कंपनीने अगोदरच पुरेसा साठा केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
कुणाला कामराने दिला मोदींना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला; काय आहे नेमके प्रकरण…
“सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावताय, ते आंदोलनाच्या नावावर वर्गणी गोळा करताय”
११ वर्षांपूर्वी शेंगा विकणाऱ्याने फुकटात दिल्या होत्या शेंगा, भावा-बहिणीने अमेरिकेतून येऊन फेडले कर्ज