Homeताज्या बातम्याभारीच! आता ६ हजारांपेक्षा कमी रुपयांत घ्या ‘या’ तगड्या ब्रँडचे स्मार्टफोन; जाणून...

भारीच! आता ६ हजारांपेक्षा कमी रुपयांत घ्या ‘या’ तगड्या ब्रँडचे स्मार्टफोन; जाणून घ्या त्यांचे फिचर्स

आजच्या काळात मोबाईल हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. पण मोबाईलच्या किंमतीत प्रचंड वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे जर तुम्ही कमी बजेटमुळे स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लान पुढे ढकलत असाल तर आता आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगल्या स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत.

तुम्ही ६ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा मोबाईल शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सॅमसंग, आयटेल, मायक्रोमॅक्स, लावासोबतच इतर बर्‍याच कंपन्यांच्या ६ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त स्मार्टफोन सांगणार आहोत

लावा झेड ६१ प्रो
तुम्ही Amazon वरून लावा झेड ६१ प्रोचा २ जीबी रॅम आणि १६ जीबी अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंट ५,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये ५.४५ इंच डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन ७२०x१४४० पिक्सेल आहे. हा फोन अँड्रोईड १० वर काम करतो. यात १.८ जीएचझेड ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. यात ३१०० एमएएचची बॅटरी आहे.

आयटेल ए २५ प्रो
जर तुम्हाला आयटेल ए २५ प्रो खरेदी करायचा असेल तर तुम्हाला हा फोन Amazon वर ४,८९९ रुपयांना मिळेल. यात ५ इंच डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन ७२०x१२८० पिक्सेल आहे. यात १.४ जीएचझेड क्वाड कोर प्रोसेसर आहे. फोनच्या मागील बाजूस ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर २ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात ३०२० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग एम ०१ कोर
तुम्ही सॅमसंग एम ०१ कोर चा १६ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट रिलायन्स डिजिटल वरून सध्या सर्वात स्वस्तात खरेदी करू शकता, येथे त्याची किंमत ५,१९९ रुपये आहे. यात ५.३० इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन ७२०x१४८० पिक्सेल आहे. यात मीडिया टेक एमटी ६७३९ क्वाड कोर प्रोसेसर आहे. तसेच १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. फोनच्या मागील बाजूस ८-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ३००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android Go एडिशनवर काम करतो.

मायक्रोमॅक्स आयवन
मायक्रोमॅक्स आयवनमध्ये २ जीबी रॅमसह १६ जीबी इंटरनल मेमरी आहे. यात ५.४५ इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस ५ मेगापिक्सेल आणि समोर ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये २२०० एमएएचची ची बॅटरी देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर त्याची किंमत ५,९९९ रुपये आहे.

आयटेल ए २३ प्रो
तुम्ही आयटेल ए २३ प्रो देखील ६ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता, हा फोन रिलायन्स डिजिटलवर ४०४० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात ५ इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन ४८०x८५४ पिक्सेल आहे. यात क्वाड कोअर १.४ जीएचझेड प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android १० Go Edition वर काम करतो.

याची रॅम १ जीबी आणि इंटरनल स्टोरेज ८ जीबी आहे, जी मायक्रो एसडी कार्डद्वारे ३२ जीबीपर्यंत वाढवता येते. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर मागील बाजूस २ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर ०.३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात २४०० एमएएचची देण्यात बॅटरी आहे.

महत्वाच्या बातम्या-
किल्ले रायगडावर सुरु होता ‘हा’ गैरप्रकार, संभाजीराजेंनी माहिती मिळताच आरोपींना शिकवला धडा
भारतीय संघातून हार्दिक पांड्याची कायमची हकालपट्टी?; ‘हा’ मुंबईकर खेळाडू घेणार जागा
कुणाल कामराने लगावला मोदींवर टोला; ‘भारतात सुरक्षित वाटत नसेल तर पाकिस्तानात जा’