Share

प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने शिंदे-भाजपला फुटला घाम; काँग्रेस- राष्ट्रवादीलाही थेट इशारा

सध्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर खुप चर्चेत आहेत. त्यांच्या एका वक्तव्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते म्हणाले आहेत की, आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित लढल्या तरी १५० जागा येतील.

आम्ही मविआसोबत मिळून जर लढलो तर २०० जागा तर आरामात जिंकू आणि सी व्होटर्सचा सर्वेही तेच सांगतोय असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. नंतर त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सल्लाही दिला आहे की, आता दोन्ही काँग्रेसनी ठरवायचं आहे, आपण चौघांनी एकत्र यायचं की भांडत बसायचं.

पुण्यातल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधील नाराजीवरही भाष्य केलं. शरद पवारांसोबतचे मतभेद मी केव्हाच सोडून दिले आहेत. त्यामुळे मविआने सोबत जाताना माझ्या बाजुने तरी कोणताही किंतु परंतु नाही.

जेव्हा आम्ही सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच असं ठरवलंय की, एकमेकांच्या नेत्यांवर टीका टाळायची त्यामुळे आता इतर पक्षाच्या नेत्यांनीही तारतम्य पाळावं, असा सल्ला त्यांनी संजय राऊतांना यावेळी दिला. यावेळी त्यांंनी असा गौप्यस्फोटही केला की, ईडी, सीबीआय आयटी या तपास यंत्रणांच्या कारवाईच्या भितीपोटी ५०० कोटींच्या वर मालमत्ता असलेल्या तब्बल ७ लाख कुटुंबीयांनी देश सोडला आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. पण या युतीवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा आहेत.शुक्रवारीच सोलापुरातील सभेत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला होता.

महाविकास आघाडी ही निवडणूकपूर्व युती नाही. निवडणुकीनंतर शिवसेना भाजपपासून वेगळी झाली, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आपली वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाशी असलेली युती ही उत्तम आणि नैतिकदृष्ट्या मजबूत युती असल्याचे ते म्हणाले.

ही निवडणूकपूर्व युती असून ती यशस्वी होईल, असेही ते म्हणाले. शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांंवर टीका करणे टाळले. महाविकास आघाडीचे नाव घेऊन ते टीका करत होते. काही दिवसांपुर्वी त्यांनी पवारांचे नाव घेऊन विधान केले होते की, शरद पवार भाजपला मिळालेले आहेत.

याची लवकरच सर्वांना कल्पना होईल. यावर संजय राऊत म्हणाले की, त्यांनी ठाकरे गटाशी युती केली आहे. त्यांना लवकरच महाविकास आघाडीत सामिल करून घेतले जाईल. याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत बोलताना काळजी घ्यावी.

महत्वाच्या बातम्या
नवरा-बायकोची गगनभरारी, एकाचवेळी MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन बनले क्लास वन अधिकारी
नवरदेव सतत जात होता नवरीच्या खोलीत, कारण कळताच उडाला भडका; लग्नमंडपातच तुफान राडा
कसे झाले मुस्लिम कुटुंबातील मानाचे सुनील शेट्टीशी लग्न? वाचा अथियाच्या आई-वडिलांची भन्नाट लव्हस्टोरी
उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार? प्रसिद्ध उद्योगपतीच्या माध्यमातून दोघांमध्ये चर्चेला सुरवात? वाचा आतली बातमी

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now