Share

नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत का गेली? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगीतले खरे कारण, वाचून धक्का बसेल

supriya sule

Politics: राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये भाजप (BJP) एनडीपीपी युती सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे राजकीय (political) वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे. महाराष्ट्रात कट्टर विरोधक ते नागालँड मध्ये एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवार साहेब बोलले आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. तेथील सरकारला नाही. पवार साहेबांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना बोलण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्राचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे आम्ही आमच्या अपेक्षा सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत. आता बजेट जाहीर झाल्यावर बघूयात, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी उत्तर देणं टाळल आहे.

दरम्यान, नागालँडमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल २ मार्च रोजी लागला आहे. या विधानसभेत ६० सदस्य होते. त्यातील एनडीपीपीने सर्वाधिक २५ जागा जिंकली आहे.‌ भाजपाने १२ जागा जिंकल्या असुन रिपब्लिकन पक्षाने दोन जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीने ७ आणि नॅशनल पिपल्स पार्टीने ५ जागा जिंकले आहे.

नागालँडमध्ये अलीकडेच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत एनडीपीपी- भाजपाप्रणीत आघाडीला ३७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७ जागा मिळाल्या असून पक्ष तिसऱ्या स्थानावर आहे. अशातच राष्ट्रवादीने एनडीपीपी-भाजप युतीला पाठिंबा जाहीर केला आहे.

यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, नागालँडमध्ये निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ विधानसभा सदस्य निवडून आले. निवडणुकीच्या काळात तेथील मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे भाजप बरोबर आम्ही युती केलेली नाही.

महत्वाच्या बातम्या
शिंदेंनंतर आता राज ठाकरेंनीही साधला डाव; मुंबईत सेनेला भलमोठे भगदाड, ‘या’ नेत्यांचा मनसेत प्रवेश  
सतीश कौशिकांच्या अचानक मृत्यूने बॉलीवूड हादरले! मृत्यूमागील खरे कारण आले बाहेर, चालू गाडीतच…
देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे मैत्रीचा हात; पहा नेमकं काय म्हणाले…   

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now