एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बडोखोरी केल्यानंतर शिवसेनेचे( Shivsena)दोन गट पडले.यादरम्यान उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठी गळती लागली.अनेक नेतेमंडळींनी पक्षांतर केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकवर एक अनेक धक्के सहन करावे लागले.अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS ) शिवसेनेच्या ठाकरे गटाला(Thackeray Group) मोठा झटका देण्यात आला आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल झाली आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवसेना नक्की कोणाची? हा सर्वांत मोठा प्रश्न उपस्थित झाला. या प्रश्नाचे उत्तर देत निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले.
त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला मोठा दिला मिळाला. मात्र, या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसला. मुंबई सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असुन मनसेने शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठ खिंडार पाडले आहे. एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ आता मनसेकडून देखील उद्धव ठाकरे यांना जोराचा झटका दिला गेला आहे.
ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबईच्या दिंडोशी विधानसभा भागातील शिवसेना ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.
हा पक्ष प्रवेश मनसे दिंडोशी विधान अध्यक्ष भास्कर परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. त्यांच्यासमोर यांच्या हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
महत्वाच्या बातम्या
सतीश कौशिकांच्या अचानक मृत्यूने बॉलीवूड हादरले! मृत्यूमागील खरे कारण आले बाहेर, चालू गाडीतच…
देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे मैत्रीचा हात; पहा नेमकं काय म्हणाले…
राजकीय भूकंप! राष्ट्रवादीची भाजपसोबत हातमिळवणी, राज्याच्या सरकारमध्येही सामील होणार