politics: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण मोठा फेरबदल पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर सत्तांतर झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय देत शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. या निर्णयामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटात तणावाचे वातावरण निर्माण झाली.
हाच तणाव कमी करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, अशी चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरेंनी राज्यभरात जाहीर सभा घेऊन भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे. यादरम्यान आत्ता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तणाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले तणाव कमी करण्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळत आहेत. फडणवीस म्हणाले की, आमच्या मित्रांना कोणीतरी भांग पाजली होती. तसेच, विरोधकांनी अशी नशा करण्यापेक्षा आता चांगली कामे करावीत, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही विधानसभेत उभे राहून म्हटलं होतं की, अनेकांनी आम्हाला त्रास दिला. या सगळ्या लोकांचा आम्ही बदला घेऊ. पण आम्ही त्यांना आधीच माफ केला आहे. आमच्या मनात आता कोणतीही कटूता नाही, असे म्हणत फडणवीस यांनी आपले मत स्पष्ट शब्दात सांगितले.
यादरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उद्देशून एक मोठा वक्तव्य केला आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांना विनंती करतो की, राऊत यांनी आजपासून मनभेत आणि मतभेद बाजूला सारून हाताला हात धरून एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करावे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.
यादरम्यान, फडणवीस यांच्या त्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झालेली आहे. आता उद्धव ठाकरे आणि भाजप मधील कटूता संपणार का? या दोघांच्या मधील संवादाची दार पुन्हा खुली होणार का? याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय भूकंप! राष्ट्रवादीची भाजपसोबत हातमिळवणी, राज्याच्या सरकारमध्येही सामील होणार
बच्चू कडूंचे दिवस फिरले! ‘या’ गुन्ह्यात कोर्टाने ठोठावली दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
परीक्षेचा दिवशीच झाला वडीलांचा मृत्यू; डोळ्यांतील अश्रू दाबून धरत प्राचीने सोडवला दहावीचा पेपर