अनेकदा चित्रपटांमध्ये तुम्ही पोलिस चोराच्या मागे धावून त्यांना पकडताना पाहिलं असेल, पण असाच एक प्रकार कर्नाटकातील मंगळुरू शहरातून समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका मजुराचा मोबाईल हिसकावून तीन चोरटे पळून जात होते, मात्र त्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक वरुण अल्वा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडीतून खाली उतरून चोरट्यांचा पाठलाग सुरू केला.
काही अंतरापर्यंत धाव घेतल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने चोरट्याला पकडले. एका व्यक्तीने त्यांचा एक व्हिडिओ शुट केला जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याबाबत नागरिकांमधून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही जणांना तर वाटले हा एखाद्या चित्रपटातील व्हिडीओ आहे पण सत्य समोर आल्यानंतर अनेकजण वरूण यांची प्रशंसा करत आहेत.
अनेकजण त्यांना रिअल लाईफ सिंघम म्हणून संबोधत आहेत. वृत्तानुसार ही घटना बुधवारी घडली असल्याचे बोलले जात आहे. शहरातील नेहरू ग्राउंड परिसरात तीन चोरट्यांनी एका मजुराचा मोबाईल हिसकावून पळ काढला. सहायक उपनिरीक्षक वरुण तेथे गस्त घालत असताना त्यांना ही बाब समजताच त्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला.
चोरटे बराच वेळ पळत राहिले आणि एएसआय त्यांचा पाठलाग करत राहिले. अखेर पोलीस कर्मचाऱ्याने अथक परिश्रमानंतर त्या चोराला पकडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तो पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. पोलिसांच्या या कामाचे त्यांनी कौतुक केले आहे.
मंगळुरु शहर पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस आयुक्तांनी एएसआय वरुण अल्वा यांना 10,000 रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणाचा यापूर्वीही चोरी, दरोड्याच्या घटनांमध्ये सहभाग आहे.
सध्या वरूण हे सोशल मीडियावर हिरो बनले असून अनेकजण त्यांच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ सर्व प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे आणि त्याला लाईक केले आहे. अनेकजण या पोलिसाचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. प्रत्येक पोलिसाने असेच असले पाहिजे असे लोक म्हणत आहेत.
https://twitter.com/MangaloreCity/status/1481599480797753344?s=20
महत्वाच्या बातम्या
घरीच अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात UPSC पास; बीडच्या शेतकऱ्याची मुलगी राज्यात पहिली
सेक्स वर्कर सेक्सला नाही म्हणू शकते तर मग पत्नी का नाही? न्यायालयाचा गंभीर सवाल
…त्या दिवशी सगळ्यांचाच बाजार उठेल; मराठी पाट्यांच्या निर्णयावरुन विश्वंभर चौधरी ठाकरे सरकारवर संतापले
राजकीय भूमिका नाही तर ‘या’ कारणामुळे किरण माने मालिकेतून बाहेर; निर्मात्यांनी सांगितलं खरं कारण






