Homeइतरराजकीय भूमिका नाही तर ‘या’ कारणामुळे किरण माने मालिकेतून बाहेर; निर्मात्यांनी सांगितलं...

राजकीय भूमिका नाही तर ‘या’ कारणामुळे किरण माने मालिकेतून बाहेर; निर्मात्यांनी सांगितलं खरं कारण

मुंबई – ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी काढून टाकण्यात आले. ही सांस्कृतिक दडपशाही असून हे राजकीय हस्तक्षेपातून घडल्याचा आरोप माने यांनी केला.

मानेंच्या या दाव्यानंतर अखेर निर्मात्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मालिकेच्या निर्मात्या सुझाना घई यांनी किरण मानेंना मालिकेतून बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार ‘किरण माने यांना त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे नाही तर प्रोफेशनल कारणांमुळे मालिकेमधून काढण्यात आले,’ असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, माने यांना प्रोफेशनल कारणांमुळे मालिकेतून रिप्लेस करण्यात आले. ही प्रोफेशनल कारणे काय होती हे माने यांना माहित होते. माने यांना त्याची अनेकदा माहिती दिली गेली होती. त्यांना अनेकदा सांगूनही त्या कारणांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घेण्यात आला,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, किरण मानेंनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गुरुवारी माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे.

याचबरोबर आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत. मानेंनी एका दैनिकाशी बोलताना, “होय, मला मालिकेतून काढून टाकले आहे. मला तासाभरापूर्वीच चॅनेलने ही माहिती दिली,” असे म्हणत मानेंनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला.

महत्त्वाच्या बातम्या –
डोक्यात सळई घुसलेल्या मुलाच्या मदतीला धावून आले वसंत मोरे; एका दिवसात जमवून दिले १४ लाख
“निवडणूका आहे म्हणून इंदुरीकरांना पाठीशी घातले जात आहे, त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा…”
भयानक! ४ दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती आली परत, जालन्यातील घटनेने सर्वत्र खळबळ