Homeताज्या बातम्या...त्या दिवशी सगळ्यांचाच बाजार उठेल; मराठी पाट्यांच्या निर्णयावरुन विश्वंभर चौधरी ठाकरे सरकारवर...

…त्या दिवशी सगळ्यांचाच बाजार उठेल; मराठी पाट्यांच्या निर्णयावरुन विश्वंभर चौधरी ठाकरे सरकारवर संतापले

राज्य सरकारने राज्यातील सर्वच दुकानदारांना दुकानाचे नाव मराठीत लिहिणे बंधनकारक केले आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरही राजकारण होताना दिसत आहे. तसेच राज्यभरातून या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. काहींनी या निर्णयाला विरोध केला आहे, तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आता सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर बोलताना चौधरी यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पाट्याच नाही, तर आतला दुकानदारही मराठी असेल, त्यासाठी काही करा, असे विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे.

दुकानाच्या पाट्याच नाही, पाट्यांच्या आतला दुकानदारपण मराठी माणूस होऊ शकेल असे काहीतरी करा, असे विश्वंभर चौधरी असे यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत फेसबूक पोस्ट केली असून त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

मराठी माणसाला मराठीच वाचता येते हा आत्मविश्वास कुठून येतो माहित नाही. पण मुंबई मनपाची निवडणूक जवळ आली की हा बोध नक्की होतो. अस्मितांचे हाकारे मतात रुपांतरित होतात. कोणी हिंदू अस्मितेचे, कुणी मुस्लिम अस्मितेचे; तर कुणी मराठी अस्मितेचा व्यापार करतो, असा टोला विश्वंभर चौधरी यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

तसेच पोट भरण्यासाठी यातलं काहीच उपयोगात येत नाही, हे कळणारी जनता तयार होईल, त्या दिवशी सगळ्यांचाच बाजार उठेल, असेही विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांनी ठाकरेवर टीका केली आहे. त्यामध्ये अभिनेते सुमीत राघवननेही ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे खरंच काही मदत होणार आहे का? तर काहीच नाही. मराठी वाचवायची असेल, तर मराठी शाळा वाचवा, मराठी पालकांना आपल्या मुलाला मराठी शाळेत दाखल करण्यासाठी प्रोत्साहीत करा. सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमात बदलत आहेत. सरकारचा हा निर्णय बॉम्बेचं मुंबई करण्यासारखाच आहे, असे सुमीत राघवनने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
बिपिन रावतांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला? अखेर सत्य आले समोर
राजकीय भूमिका नाही तर ‘या’ कारणामुळे किरण माने मालिकेतून बाहेर; निर्मात्यांनी सांगितलं खरं कारण
डोक्यात सळई घुसलेल्या मुलाच्या मदतीला धावून आले वसंत मोरे; एका दिवसात जमवून दिले १४ लाख